महाराष्ट्र

अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

Akola News : अकोल्यात धक्कादायक निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. वंचितच्या खतिब कुटुबांची ६५ वर्षांची सत्ता काँग्रेसने उलथवून लावली.

Vishal Gangurde

अकोल्यातील नगरपरिषदांच्या निकालाकडे होतं सर्वांचं लक्ष

बाळापूर नगरपरिषद वंचितच्या हातून निसटली

प्रकाश आंबेडकरांसह माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांना मोठा धक्का

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : अकोल्यातील नगरपरिषदांची निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळाले आहे. सहापैकी चार नगरपालिकेवर भाजपची सत्ता आली. तर बाळापूर नगपरिषदेवर लोकांचं विशेष लक्ष लागलं होतं. बाळापूर नगरपरिषदेच्या निकालाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांसह माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांना मोठा धक्का बसलाये.

काँग्रेसने बाळापूरमध्ये खतीब कुटुंबाच्या 65 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. तर पहिल्यांदाचं स्थापन झालेल्या हिवरखेड नगरपालिकेवर पहिलाच नगराध्यक्ष भाजपचा झालाय. तर बार्शीटाकळी नगरपंचायतवर वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष विजयी झाला. दरम्यान, अकोट, हिवरखेड, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या ठिकाणी भाजपने सत्ता आणली.

तत्पूर्वी, अकोट मतदारसंघातील अकोट, हिवरखेड, तेल्हारा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्याने विद्यमान भाजपचे आमदार प्रकाश भाडसाकडे यांची मोठी ताकद वाढलीये. तर मूर्तिजापूरमध्ये भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर भाजपची सत्ता आलीये. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहूया...

अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांचे विजयी उमेदवार

1) अकोट : माया धुळे : भाजप

2) हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे

3) मुर्तिजापूर : भाजप : हर्षल साबळे

4) बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन

5) तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल

6) बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून

नगराध्यक्ष पक्षीय बलाबल

एकूण जागा : 06

भाजप : 04

वंचित : 01

काँग्रेस : 01

अकोला जिल्ह्यातील नगरसेवक पदाचे पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 142

भाजप : 50

काँग्रेस : 24

वंचित : 20

उबाठा : 07

शिंदे सेना : 08

अजित राष्ट्रवादी : 04

शरद राष्ट्रवादी : 02

प्रहार : 03

एमआयएम : 07

अपक्ष : 12

स्थानिक आघाड्या : 05

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

SCROLL FOR NEXT