BJP Sarpanch death Case 
महाराष्ट्र

भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; आरोपीही भाजपचाच निघाला; राज्यात खळबळ

BJP Sarpanch death Case : बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात करमोडा गावचे भाजप सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

BJP Sarpanch suicide, Deepak Ugale : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक राजकीय हादरवणारी घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच आणि भाजपचे स्थानिक नेते दीपक प्रकाश उगले यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. धक्कादायक बाब म्हणजे, हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्यावर होत असलेल्या त्रासाची कैफियत मांडली होती.

पक्षांतर्गत वाद अन् छळाचे गंभीर आरोप

आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडिओत दीपक उगले यांनी अत्यंत उद्विग्न मानसिकतेत धक्कादायक खुलासे केले आहेत. "माझ्याच पक्षातील काही राजकीय विरोधक आणि नेते मला सतत त्रास देत आहेत. त्यांच्या धमक्यांना आणि मानसिक छळाला मी आता कंटाळलो आहे," असे सांगत त्यांनी या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक उगले यांनी ज्या व्यक्तीमुळे आयुष्य संपवलं ती व्यक्तीही भाजपचीच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे.

शेतात गळफास अन् गावात तणावपूर्ण शांतता

दीपक उगले हे करमोडा गावचे लोकप्रिय आणि विद्यमान लोकनियुक्त सरपंच होते. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच स्वतःच्या शेतात जाऊन गळफास लावून घेतला. ही माहिती गावात आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी शेताकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तरुण आणि कार्यक्षम सरपंचाच्या अशा अकाली जाण्याने करमोडा गावावर शोककळा पसरली असून समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलीस तपासाचीचक्रे वेगाने; निष्पक्ष कारवाईची मागणी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आत्महत्येपूर्वीचा तो व्हिडिओ तपासासाठी ताब्यात घेतला असून, त्यातील मजकुराच्या आणि जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Rules: कामाची बातमी! PF मध्ये झाले ९ मोठे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम, आताच घ्या माहिती जाणून

मूड खराब असेल तर घ्या सुट्टी! काय आहे ‘Unhappy Leave’ पॉलिसी? समजून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची अखेर बदली

Dosa Recipe : मुलं दुधी भोपळा खात नाहीत? मग 'असा' बनवा कुरकुरीत डोसा, एकदा चव चाखताच पुन्हा पुन्हा मागतील

मोठी बातमी! विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली, अविनाश रणखांब यांच्याकडे नवीन जबाबदारी

SCROLL FOR NEXT