Loksabha Election Mahayuti  saam Tv
महाराष्ट्र

Loksabha Election: शिंदे गटाच्या पराभवाला भाजप जबाबदार? भाजपच्या सर्व्हेवर शिंदे गटाचा ठपका

Loksabha Election Mahayuti : 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला लोकसभेच्या निकालात मोठा दणका बसलाय. तर 15 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या शिंदे गटाचे केवळ 7 खासदार निवडून आलेत. त्यामुळे शिंदे गटाने या पराभवाला भाजपला जबाबदार धरलंय. त्यावरचा हा खास रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

लोकसभेचा निकाल जाहीर झालाय. यात शिंदे गटाला 15 पैकी 7 जागाच राखण्यात यश मिळालंय. मात्र शिंदे गटाच्या कमी झालेल्या जागांसाठी शिंदे गटाने भाजपला जबाबदार धरलंय. सर्व्हेच्या नावानं काही जागा बदलण्यात आल्या. त्याचा फटका शिंदे गटाला बसल्याचा थेट आरोपच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केलाय.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर 13 खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. यापैकी निम्मे खासदार निवडून येणार नसल्याचं भाजपच्या सर्व्हेत सांगण्यात आले होतं. त्यामुळे शिंदे गटावर विद्यमान खासदारांच्या तिकीटाला कात्री लावण्याची नामुष्की ओढावली. त्याचा फटका शिंदे गटाला बसल्याची चर्चा रंगलीय.

रामटेकमधून कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं.

यवतमाळ-वाशिममधून भावना गवळींच्या उमेदवारीला कात्री

हिंगोलीत हेमंत पाटील यांचं तिकीट बदललं गेलं.

नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना अखेरच्या दिवसांत उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दक्षिण मुंबईत यामिनी जाधवांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाला.

शिर्डीत सदाशिव लोखंडेच्या उमेदवारीलाही उशीर करण्यात आल्याचा फटका बसला.

शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात वातावरण असल्याचं सांगत त्यांचं तिकीट कापलं गेलं. खासदारांचं तिकीट कापण्यात आल्यानं आमदारांमध्येही तिकीट काटलं जाण्याची धाकधूक होती. त्याचाही फटका बसलाय. भाजपचे दोनच विद्यमान खासदार निवडून आले. त्यामुळे सर्व्हेवरून खदखद समोर येण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे यावरून महायुतीत वाद रंगण्याची चिन्ह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT