Raosaheb Danve vs Abdul Sattar Saam TV
महाराष्ट्र

विरोधकांनी माझ्यामागे सिल्लोडचा औरंगजेब लावला; रावसाहेब दानवेंचं खळबळजनक विधान

आज पुन्हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना नेते एकमेकांवर टीकेचा भडीमार करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर राज्यसभा निवडणुकीवरून टीका केली होती. आता रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 'विरोधकांनी टीका करण्यासाठी सिल्लोडचा औरंगजेब माझ्या मागे लावला' असं खळबळजनक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. (Shivsena Abdul Sattar vs BJP Raosaheb Danve Latest News)

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगाच राज्यसभेत आपल्याला मतदान करेल, असा दावा केला होता. त्यानंतर भाजप आमदार संतोष दानवे यांनी सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीत सत्तार यांनी भाजपला जशी मदत केली, अशीच मदत ते विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पुन्हा करतील असा खोचक टोला लगावला होता.

आज पुन्हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. 'सिल्लोडचा औरंगजेब माझ्या मागे टीका करण्यासाठी भाड्याने लावला, छत्रपतींच्या पाठीमागे औरंगजेब बरा नाही' असा घणाघात रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे. जालन्यात पत्रकारांसोबत बोलतांना दानवे यांनी हा घणाघात केलाय.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली आहे. जालना नगर पालिकेला मुख्यमंत्री फडणवीस असताना अंतर्गत पाईप लाईन साठी 129 कोटींचा निधी दिला हा निधी कुठे गेला याचा हिशेब राज्य सरकारने द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

अडीच वर्षात रजत सरकारने जालना पालिकेला एक रुपयाचाही निधी दिला नाही. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. इतकंच नाही तर, विरोधकांमध्ये हिम्मत असेल तर व्यासपीठावर येऊन माझ्यावर टीका करून दाखवावी असं आव्हान देखील दानवे यांनी नाव न घेता खोतकर आणि अब्दुल सत्तार यांना दिलं आहे.

दरम्यान, आज जालन्यात भाजपने महाविकासआघाडी सरकारविरोधात जलआक्रोश मोर्चा काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील भाजप नेते जालन्यात दाखल झाले आहे. औरंगाबादेतील पाणीप्रश्नानंतर आता भाजपने जालना शहरातील पाणी प्रश्नावरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

Dark Circles Symptoms: डोळ्यांखाली डार्क सर्कल कोणत्या कमतरतेमुळे येतात? ही आहेत लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT