Anil Bonde and sanjay raut saam tv
महाराष्ट्र

'संजय राऊत यांचा अहंकार आडवा येतोय, सत्तेचा माज बरा नव्हे', खासदार अनिल बोंडेंचा घणाघात

भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊतांचा समाचार घेतलाय.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपवर सडकून टीका केली होती. घोडेबाजारातील घोड्यांमुळे महाविकास आघाडी सरकारवर (mva government) कोणताही परिणाम होत नाही,असा घणाघात राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे केला होता. राऊतांच्या या विधानाचा भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी समाचार घेतलाय.

संजय राऊत यांचा अहंकार आडवा येतोय. संजय राऊतांना निवडणूक समजली नाहीय. शिवसेनेने एक नंबरची उमेदवारी संजय पवार यांना का दिली नाही? सत्तेचा माज बरा नव्हे, अशा कठोर शब्दांत बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले, आमदार मुक्ताताईला भेटून आनंद झाला. स्वतःची तब्येत बरी नसतानाही त्यांनी घर सोडून मोलाचं योगदान दिलं.

तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आजारी असताना मतदानाचा हक्क बजावला. असे लोकप्रतिनिधी कर्तव्याची जाण ठेवतात. म्हणून आम्ही आमच्या विजयाचं श्रेय या दोघांना दिलं आहे. मी त्यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. त्यांनी दोघांनी लवकर बरे होऊन समाजकारण पुन्हा सुरु करावे, अशी मी प्रार्थना करतोय. तसेच शिवसेनेवर टीका करताना बोंडे म्हणाले, त्यांनी संभाजी राजेंना फसवलं आणि त्यांच्या मावळ्याला देखील फसवले. छत्रपती संभाजीराजेंचा अपमान करण्यात आला आणि संजय पवारांचाही अपमान केला.

नाना पटोलेंनी एमआयएमच्या मतांचे संशोधन करावे. स्वतःच घर सांभाळता येत नाही आणि एमआयएमला शिकवायला निघाले आहेत, असा टोलाही बोंडे यांनी पटोले यांना लगावला. बाळासाहेब गेल्यापासून शिवसेना फसवण्याचं काम करत आहे.फसवणूकीशिवाय शिवसेनेला दुसरा धंदा नाही. सुहास कांदेंचं एक मत बाद झालं नसतं, तरी पराभव होणार होता. संजय राऊत यांनी संभाजीराजेंचा अपमान केला. मावळ्याचाही अपमान केला.सरकार चालवताना समन्वय नाही.महाराष्ट्राचं वाटोळं होतंय, असं म्हणत ठाकरे सरकारवर बोंडे यांनी तोफ डागली.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: 'परमसुंदरी' अप्सरा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक, पाहून मन होईल घायाळ

Maharashtra Live News Update: Parbhani: बस आणि पिकअपचा भीषण अपघात, बस झाली पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Tharala Tar Mag : सायलीच्या आयुष्यात पुन्हा येणार 'प्रिया' नावाचे वादळ, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT