Maharashtra Corona: काळजी घ्या! दिवसभरात कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ

मुंबईत कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे.
Corona in Maharashtra
Corona in MaharashtraSAAM TV
Published On

मुंबई: आज राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण २ हजारांच्या पुढे पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्य यंत्रणांना चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात राज्यात २७०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत. तर १,३२७ रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोना (Corona) रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

मुंबईत कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. आज दिवसभरात १,७६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Corona in Maharashtra
Corona Update : ओमिक्रॉनच्या BA.5 व्हेरियंटचा पुण्यात सापडला आणखी एक रुग्ण

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०० टक्क्यांवर नोंदवण्यात आले असून, मृत्यूदर १.८७ टक्के इतका झाला आहे. दिवसागणिक वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्येतदेखील मोठी वाढ झाली आहे.

Corona in Maharashtra
काळजी घ्या! देशात २४ तासांत ८ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद; १० मृत्यू

देशात २४ तासांत ८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

देशातील कोरोना रुग्णांची संख्या (corona new patients) सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 8,329 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 40,370 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे शुक्रवारी आढळून आलेल्या नवीन प्रकरणांची संख्या गुरूवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत 9.8 टक्के अधिक आहे. दैनिक सकारात्मकता दर 2.41 टक्के आहे. भारतात एकूण केस लोड 4,32,13,435 आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासांत 4 हजार 216 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र गेल्या बुधवारी देशात एकाच दिवशी पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढतच गेली. दरम्यान, नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 42 लाखांवर पोहचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 747 आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com