BJP Protest in Amravati Against Congress  
महाराष्ट्र

Amravati : अमरावतीमध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, धक्काबुक्की अन् बाचाबाची |VIDEO

BJP Protest Over National Herald Scam : नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्यावरून काँग्रेसविरोधात भाजपने तीव्र आंदोलन केले. अमरावतीमध्ये तणावग्रस्त वातावरण झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

Namdeo Kumbhar

BJP Protest in Amravati Against Congress : नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाविरोधात अमरावतीमध्ये भाजपने तीव्र आंदोलन केले. मालटेकडी येथून श्यामनगर चौकापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली आणि काँग्रेस भवनासमोर निदर्शने केली. यावेळी काँग्रेस भवनाबाहेर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पण भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येच जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

अमरावीतमध्ये काँग्रेसविरोधात भाजपचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दोघांमधील राडा कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी भाजपचा मोर्चा काँग्रेस भवनापर्यंत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तणाव वाढला. श्यामनगर ते काँग्रेस भवन या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमरावती येथील आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ उपस्थिती लावली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT