Buldhana BJP Protest Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana BJP Protest: बुलडाणा-रायपूर रस्त्याची दुर्दशा, अपघातांची संख्याही वाढली, भाजपकडून रास्तारोको

गेल्या अनेक वर्षांपासून बुलडाणा-सैलानी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून बुलडाणा-सैलानी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे आणि खड्ड्यांमुळे काही महिलांची प्रसूती वाहनांमध्येच झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली (BJP Protest In Buldhana To Solve The Issue Of Bad Condition Of Buldhana-Raipur Road).

मात्र, संबंधितांनी दखल घेतली नसल्याने आज भाजपा (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन आज बुलडाणा (Buldhana) येथे रास्तारोको आंदोलन केले. सागवान येथील पैनगंगा नदीच्या पुलावर करण्यात आलेल्या आंदोलनाला असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते. तर कार्यकर्त्यांनी रास्तारोको केल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दांदळे यांनी लेखी आश्वासन देत तात्काळ रस्त्याचे काम सुरू केले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

वाहतुकीचा खोळंबा होत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही वेळ बाचाबाची देखील पाहायला मिळाली. यावेळी आंदोलनाला डॉ. राजेश्वर उबरहंडे, पद्मनाथ बाहेरकर, सतीश भाकरे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT