Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Health Problems Yawning: सतत जांभया येत असतील तर ती केवळ झोपेअभावाची लक्षणं नसून शरीरात ऑक्सिजनची कमतरता, हृदय वा मेंदूविषयक समस्या दर्शवू शकते. तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या.
excessive yawning
yawning causesgoogle
Published On
Summary

सतत जांभया येणे हे शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याचं संकेत असू शकतं.

झोपेचा दर्जा खराब झाल्यास किंवा हृदय-मेंदूवरील ताण वाढल्यास जांभया वाढतात.

लोहाची कमतरता, अॅनिमिया, स्लीप ॲप्निया यामुळेही जांभई वाढते.

योग्य झोप, हलका व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ही समस्या कमी होऊ शकते.

जांभई येणं ही सामान्य गोष्ट आहे. थकवा, कंटाळा किंवा झोप येतेय याचं चिन्ह म्हणून जांभई देतो. मात्र, सतत जांभया येत असतील तर हे शरीरात काहीतरी बिघडल्याचं संकेत असू शकतं. डॉक्टरांच्या मते, जांभईचं थेट नातं मेंदू, हृदय आणि शरीरातील ऑक्सिजनशी जोडलेलं आहे. सामान्य प्रमाणात जांभई घेतल्याने मेंदू ताजातवाना राहतो, पण वारंवार जांभई येणं हे कमी झोपेच्या समस्या, झोपेचे विकार किंवा थकवा यांचं कारण असू शकतं.

झोप नीट न झाल्याने शरीर थकलेलं असतं आणि ते जागं राहण्यासाठी सतत जांभया येतात. मात्र, काही वेळा ही समस्या जास्त गंभीरही असू शकते. वारंवार जांभई येणं हृदयाच्या समस्या असल्याचे संकेत असू शकतं. मेंदू आणि हृदय यांचा संबंध 'वॅगस नर्व' नावाच्या मज्जातंतूने जोडलेला असतो. हृदयावर ताण आल्यास किंवा उत्तेजना वाढल्यास शरीरात जास्त जांभया येऊ शकतात.

डॉक्टर सांगतात की मेंदूचे आजार, जसे की एपिलेप्सी किंवा ट्युमर, यांमुळेही जांभईची पद्धत बदलू शकते. जर जांभईसोबत डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव किंवा स्मृती कमी होणं अशी लक्षणं दिसत असतील, तर मेंदूविषयक आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्सिजन आणि लोह (Iron) यांचा संबंध देखील यात महत्त्वाचा आहे. शरीरात लोह कमी झाल्यास रक्तात ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो, त्यामुळे शरीर जांभई घेऊन जागं राहण्याचा प्रयत्न करतं. अशा अवस्थेत शरीराला थकवा जाणवतो आणि वारंवार जांभई येते.

excessive yawning
Diwali Simple Rangoli: दिवाळीत कमी वेळेत सुंदर आणि सोपी रांगोळी काढायचीये? मग या डिजाईन्स पाहाच

हलकं चालणं किंवा स्ट्रेचिंग केल्यानेही शरीराला ऑक्सिजन मिळतो आणि झोपेचा दर्जा चांगला राहतो. जर सतत जांभया येत असतील, आणि त्यासोबत छातीत वेदना, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास, किंवा अतिशय थकवा जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ही केवळ साधी जांभई नसून, शरीरातील गंभीर आरोग्य समस्येची पहिली सूचना असू शकते

Q

सतत जांभया येण्याची कारणे काय?

A

थकवा, झोपेचा अभाव, ऑक्सिजनची कमतरता किंवा हृदय-मेंदूवरील ताण ही मुख्य कारणं असू शकतात.

Q

जांभईचं हृदयाशी काय नातं आहे?

A

हृदय आणि मेंदू ‘वॅगस नर्व’ने जोडलेले असल्याने हृदयावर ताण आल्यास शरीरात जांभया वाढू शकतात.

Q

वारंवार जांभई येणं धोकादायक आहे का?

A

जर सतत जांभया येत असतील आणि त्यासोबत छातीत वेदना किंवा थकवा असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com