JP Nadda Nagpur Tour Cancelled Saam TV
महाराष्ट्र

JP Nadda News : जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा अचानक रद्द; कारणही आलं समोर

JP Nadda Nagpur Tour Cancelled : जेपी नड्डा यांच्याजागी आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांना स्मृती इराणी नमो राष्ट्रीय युवा संमेलनात सहभागी होऊन तरुणांना संबोधित करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज मसूरकर | मुंबई

Nagpur News :

नागपूर विद्यापीठाजवळ भाजपच्या युवा मोर्च्याच्या राष्टीय नमो युवा संमेलनाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हजेरी लावणार होते. मात्र अचानक त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे.

जेपी नड्डा यांच्याजागी आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांना स्मृती इराणी नमो राष्ट्रीय युवा संमेलनात सहभागी होऊन तरुणांना संबोधित करणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. जेपी नड्डा या कार्यक्रमात तरुणांना संबोधित करणार होते.  (Latest Marathi News)

भाजपच्या या कार्यक्रमावरुन विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शैक्षणिक परिसरात राजकीय कार्यक्रम पार पडत असल्याने त्याला संघटनांचा विरोध आहे. भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमांना विद्यापीठ थेट परवानगी देत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. लाखो तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील असा अंदाज बांधला जात आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची आज तेलंगणामधील अदिलाबाद येथे जाहीर सभा होत आहे. त्यासाठी ते नांदेडमार्गे तिथे जाणार आहेत. तर अमित शाह आज छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. दोन्ही ठिकाणी अमित शाह सभा घेऊन संबोधित करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT