Maharashtra Politics News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics News : विरोधी पक्षाला फोडण्याचा भाजपचा प्लॅन? शाहांसोबतच्या बैठकीत मेगाप्लॅन?

मविआ फोडण्यासाठी भाजपचं ऑपरेशन लोटस, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Satish Kengar

Ajit Pawar Latest News : आगामी निवडणुकांच्या आधी अनेक महत्वाचे विरोधी पक्ष नेते भाजपमध्ये सामील होऊ शकतात, अशी माहिती 'साम टीव्ही'ला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्ष नेत्यांना भाजपात घेण्याचा प्लॅन असल्याचं सूत्रांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत.

यातच सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अडीच तास बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत भाजपचे अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत हा मेगाप्लॅन ठरला असल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

शनिवारी शाह यांच्या बैठकी खाली ही अतिशय महत्वाची बैठक पार पडली. याचवेळी हा मेगाप्लॅन ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यामध्येच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमित शाह यांची गुप्त भेट घेतली अशी चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी खुलासा करत म्हटलं आहे की, ''अमित शाह यांच्यासोबत भेटल्याच्या बातम्या खोट्या आहेत.''

अजित पवार जरी असे म्हटले असले तरी राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. याच दरम्यान आता शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन किर्तीकर यांनी अजित पवारांचं भाजप आणि शिवसेना युतीत स्वागत करू असं म्हटलं आहे.

ते म्हणाले आहेत की, अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन पहाटेचा प्रयत्न केला, तो आपण पाहिला. ते म्हणाले आहेत की, अजित पवार भाजप आणि शिवसेना युतीत येत असतील तर त्यांना आमचा विरोध नसून आम्ही त्यांचं स्वागतच करू.

मविआचा गट फोडण्याचा भाजपचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

महाविकास आघाडीमधील एक गट फोडण्याचा प्रयत्न वेगाने सुरु आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणाले आहेत की, महाविकास आघाडीचा एक गट फोडायचा वेगाने प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरु आहे. याशिवाय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही. वर्षभरापेक्षा जास्त या निवडणुका लांबल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी भगदाड पडतंय का? कुठे ऑपरेशन कमळ करता येईल का? याचा प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

SCROLL FOR NEXT