Sanjay Raut on Sharad Pawar: 'भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव, सिल्व्हर ओकवरील बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य,' राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut : 'शिंदेंसोबत केलं तेच तंत्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत वापरात आहेत', भाजपवर राऊतांच्या हल्लाबोल
Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad PawarSaam tv
Published On

Sanjay Raut on Sharad Pawar: विरोधीपक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राज्यातील राजकरणात रंगली आहे. अशातच शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत म्हणाले आहेत की, ''भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.''

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की, ''मी आणि उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात शरद पवार याना भेटलो. आमची प्रदीर्घ चर्चा झाली. ही चर्चा महाविकास आघाडीच्या संदर्भात, राज्यातील राजकारण यावर झाली. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वापरून विरोधी पक्षाचे आमदार फोडायचे, यावरही चर्चा झाली.''

Sanjay Raut on Sharad Pawar
Maharashtra Bhushan Award : शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील; अप्पासाहेबांनी सर्वांना सांगितली भविष्याची वाटचाल

संजय राऊत म्हणाले की, ''शिवसेनाबाबतही त्यांनी तेच तंत्र वापरलं आणि आमदार फोडले. यातच आदित्य ठाकरे यांनी देखील सांगितलं, कसे प्रमुख नेते ईडीच्या भीतीने रडत होते. तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या बाबतीत वापरलं जात आहे. हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, यावर चर्चा झाली.'' (Latest Marathi News)

Sanjay Raut on Sharad Pawar
KTM ने लॉन्च केली 390 बाईक, पूर्वीपेक्षा 58,000 रुपयांनी कमी असेल किंमत

संजय राऊत पुढे म्हणाले की, ''शरद पवार यांनी सांगितलं, काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. कितीही दबाव असला तरी आम्ही तो निर्णय घेणार नाही, असं त्यांनी आम्हाला ठामपणे सांगितलं. यातच काही आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आहे. तपास यंत्रणांद्वारे मुलांना बोलावलं जात आहे . घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जातं, असे आमदार दबावात आहे. तो निर्णय त्यांचा असतो, तो निर्णय पक्षाचा नसतो, असं शरद पवार यांचं म्हणणं आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com