Maharashtra Bhushan Award : शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील; अप्पासाहेबांनी सर्वांना सांगितली भविष्याची वाटचाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Maharashtra Bhushan Award
Maharashtra Bhushan AwardSaam Tv

Appasaheb Dharmadhikari News : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील असे देखील अप्पासाहेबांनी सांगितले. (Latest Marathi News)

Maharashtra Bhushan Award
Bhagwat Karad on Ambadas Danve: कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नाही; भागवत कराड यांची अंबादास दानवेंवर टीका

आजचा हा पुरस्कार (Award) माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केलं आणि तुम्ही साथ दिली, आजच्या या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. एका घरात दुसरा पुरस्कार देणं ही घटना महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेही झाली नाही, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितलं.

आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहिरात करायची गरज काय आहे. मानवता धर्मात प्रत्येक मनुष्याने उभं रहावं. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन. मला विश्वास आहे. सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असंही धर्माधिकारी म्हणाले.

Maharashtra Bhushan Award
Ajit Pawar On Amit Shah : अमित शहांसोबतच्या भेटीच्या चर्चेवर अजित पवारांनी केला खुलासा; म्हणाले, मुंबईमध्ये अमित शहा...

माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण, पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो,तो लहान कधीच नसतो. समाज आणि देशाचे आपल्यावर ऋण आहे, ते आपण फेडले पाहिजे. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय मी हे काम करत आहे, त्यामुळे तुम्हीही कार्य करा असे देखील धर्माधिकारी यावेळी म्हणाले.

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com