Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत धुसफूस? भाजप कार्यकर्त्यांनी दादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

Ajit Pawar: महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आलीये. नारायणगावात राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले आणि निदर्शनेही केली. भाजपाच्या या विरोधामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका बजावली नसल्याचा आरोप होतोय.

Girish Nikam

तिन पक्षांचं सरकार असलेल्या महायुतीत सारं काही आलबेल नाही हे सातत्यानं समोर येत आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातच भाजपकडून दादांना विरोध होतोय. हे विशेष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्नरमधील नारायणगावात जनसन्मान यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या कार्यक्रमाला येताच भाजपा कार्यकर्त्यांनी अजितदादांना काळे झेंडे दाखवले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शने केली. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांनी दादांविरोधात संताप व्यक्त केलाय. अजितदादा शासकीय कार्यक्रमात नेहमी डावलतात. त्यांनी पालकत्वाची भूमिका बजावली नसल्याचा आरोप बुचके यांनी केलाय.

बुचके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र काही वेळातच त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकारावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चर्चा करुन मार्ग काढता आला असता, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हंटलंय...तर याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, असं थेट आव्हान आमदार अमोल मिटकरींनी दिलंय.

दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना या घटनेबाबत माध्यमांनी विचारलं असता येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडींचं सुतोवाच त्यांनी केलंय.

यापूर्वी देखील अजित पवारांना विरोध झाला होता. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला. अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी केली होती. महायुतीत पुणे जिल्ह्यातूनच ठिणगी पडतेय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीतली दरी महायुतीला मारक ठरु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

SCROLL FOR NEXT