Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale  Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Udayanraje Bhosale News : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे. 'शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांनी धर्मात भेदभाव केला नाही. कुठलाही वाद न करता हे दोघे स्वराज्यरक्षक ही होते आणि धर्माच रक्षण केल्याने धर्मवीर देखील होते, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली. (Latest Marathi News)

छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे भोसले म्हणाले, 'धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर मी काय बोलू? शिवाजी महाराज यांचे जे योगदान आहे.मी अगोदर बोललो तसं शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन कोण कोण काही न काही न बोलत असतो. शिवाजी महाराजांनी कधी जाती-धर्मात भेदभाव केला नाही'.

'कुठलाही वाद न करता हे दोघे स्वराज्यरक्षक देखील होते. धर्माचं रक्षण केल्याने धर्मवीर पण होते. मी महाराष्ट्राभर यात्रा काढणार,वेगवेगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण केले जातात. लहानपणी एकत्र असताना आता आपण तुटक राहतो. मी उघडपणे बोलतो, असे उदयनराजे भोसले पुढे म्हणाले.

'जे विषय घ्यायचे, ते घेतले जात नाहीत. शेतकऱ्यांचा विषय आहे,असे वाद कितीही घातले तरी या लोकांनी एवढं केलं तर आवमान तरी करू नका, असे मत उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

धर्मवीर की स्वराज्यरक्षक असा वाद का झाला?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळात संभाजी महाराजांवर वक्तव्य केलं होत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी अजित पवार यांच्यावर चौफेर टीका केली होती. अजित पवार म्हणाले होते, 'आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Rohit Pawar News | अजित पवारच नाटकं करतात, रोहित पवारांचा घणाघात

T-20 World Cup 2024: विराट,रोहितसह हे स्टार खेळाडू खेळणार आपला शेवटचा टी -२० वर्ल्डकप

SCROLL FOR NEXT