bjp mp accident  Saam tv
महाराष्ट्र

भाजप खासदाराच्या कारचा घोडबंदर रोडवर भीषण अपघात, भरधाव डंपरने दिली धडक

hemant savara accident : घोडबंदर रोडवर भाजप खासदाराच्या कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातातून खासदार थोडक्यात बचावले आहेत .

Vishal Gangurde

महाराष्ट्रात आणखी एका खासदाराच्या कारला अपघात

भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या कारला अपघात

सुदैवाने हेमंत सावरा यांना कोणतीही दुखापत नाही

मनोज तांबे, साम टीव्ही

महाराष्ट्रातील आणखी एका खासदाराच्या कारचा अपघाता झाला. भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. घोडबंदर रोडवर शुक्रवारी सकाळी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. या अपघातात खासदारांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. तर या अपघातातून खासदार हेमंत सावरा थोडक्यात बचावले आहेत.

दोन दिवसांपूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात झाला होता. त्यानंतर आज शुक्रवारी पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघाताची दुर्घटना सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर घडली. खासदार यांची कार चुकीच्या मार्गाने येत असतान समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने डॉ. सावरा यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघातात सावरा यांच्या कार चालकाला किरकोळ दुखापत झाली. अपघाताच्या वेळी खासदारांची गाडी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. तर डंपर मुंबईच्या लेनवरून येत होता. त्याचवेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

दोन दिवसापूर्वी बजरंग सोनवणेंच्या कारला अपघात

दोन दिवसांपूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली होती. या धडकेत बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा मागील काच फुटला होता. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला होता. खासदार सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता. त्याचवेळी ही घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT