anil bonde  saam tv
महाराष्ट्र

Shraddha Case : दिल्लीत लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धाचा बळी; अनिल बोंडेंचा आरोप

दिल्लीच्या खळबजनक घटनेवर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सदर प्रकरण हे लव्ह जिहाद प्रकरण असल्याचा आरोप केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Anil Bonde News : दिल्लीत प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. प्रियकर आफताबने हत्या करुन प्रेयसी श्रद्धाच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडेही केले. दिल्ली येथील मेहरौली परिसरात घडलेल्या या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. या खळबजनक घटनेवर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सदर प्रकरण हे लव्ह जिहाद प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. 'आंतरधर्मीय विवाह कायद्यात बदल व्हावा, अशी मागणी बोंडे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

खासदार अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अनिल बोंडे यांनी दिल्लीतील घटनेवर भाष्य केलं. अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले, 'सर्व हिंदूच्या मुलींनी जागृत व्हायला हवं. आफताब क्रूर होता. श्रद्धाला त्यानं मारलं. यासाठी कायद्यात सुधारणा व्हावी. आंतरधर्मीय विवाह कायद्यात बदल व्हावा'.

'मुलींना जाळ्यात पकडले जातं. त्याच्यामुळे जनजागृती झाली पाहिजे. आंतरधर्मीय विवाहाला विरोध म्हणण्यापेक्षा या क्रूर पद्धतीला माझा विरोध आहे. त्यासाठी कायदाही अतिशय आवश्यक आहे. कोणी आंतरधर्मीय विवाह (Marriage) करत असेल, तर तो रजिस्टर ऑफ मॅरेज ब्युरोकडेच झाला पाहिजे. त्या मुलीच्या सुरक्षेची हमी मिळाली पाहिजे. तसेच कुटुंबालाही सुरक्षा मिळाली पाहिजे ', असेही बोंडे म्हणाले.

अनिल बोंडे यांनी अमरावती दंगलीला एक वर्ष पूर्ण झाले, त्यावर देखील बोंडे यांनी भाष्य केलं. '४० हजार मुस्लिमांच्या विरोधातील ही प्रतिक्रिया होती. आता पोलीस कारवाई होत आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यानं पोलिसांचता आत्मविश्वास वाढला आहे', असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT