Shruti Vilas Kadam
एका ग्लास पाण्यात २ चमचे चहा पत्ती घालून उकळा. पाणी सुमारे एक चतुर्थांश राहिल्यावर गॅस बंद करा. पाणी गाळून पूर्ण थंड होऊ द्या.
चहा पत्तीच्या पाण्यामुळे केसांच्या मुळांना म्हणजेच हेअर फॉलिकल्सना मजबुती मिळण्यास मदत होऊ शकते.
मुळांना मजबुती मिळाल्याने केस तुटणे आणि गळणे काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र याबाबत अधिक वैज्ञानिक पुरावे आवश्यक आहेत.
चहा पत्तीतील टॅनिन आणि अँटिऑक्सिडंट्समुळे केसांची नैसर्गिक चमक वाढण्यास मदत होऊ शकते.
नैसर्गिकरित्या काळ्या केसांवर चहा पत्तीच्या पाण्याचा वापर केल्यास केसांचा रंग थोडा अधिक गडद किंवा ब्राइट दिसू शकतो.
चहा पत्तीमध्ये असलेले कॅफीन केसांच्या वाढीसाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र याला खात्रीशीर उपचार मानू नये.
स्वच्छ केसांच्या मुळांवर कॉटनच्या मदतीने चहा पत्तीचं थंड पाणी लावा. ३० ते ६० मिनिटे ठेवून केस धुवा आणि नंतर कंडिशनर वापरा. प्रथम पॅच टेस्ट करणेही महत्त्वाचे आहे.