Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

CM Devendra Fadnavis Big Dicision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला. दुष्काळाच्या यादीमध्ये वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला.
Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
CM Devendra Fadnavis saam tv
Published On: 
  • महाराष्ट्रातील आणखी तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश

  • फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

  • आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली

  • दुष्काळातून वगळलेल्या इतर तालुक्यांचा यादीत समावेश

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुष्काळासंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला. दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. फडणवीस सरकारने आधी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. आता राज्यातील उर्वरीत तालुक्यांचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दुष्काळासंदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक नियमित घ्या, मंत्र्यांनी आपल्या सूचना नियमितपणे या उपसमितीकडे द्याव्या. जे तालुके समाविष्ट झालेले नाहीत त्याबाबत अन्य निकष लावून मदतीबाबत प्रस्ताव सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांना सांगितले.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Drought: दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, शासन निर्णय उद्याच काढणार

त्याचसोबत, 'पाणीवापर कसा करायचा याचा स्वयंस्पष्ट GR काढा. पिण्याचे पाणी गृहीत धरताना त्यात जनावरांचे पाणी समाविष्ट करा आणि नंतर इतर प्राधान्यक्रम ठरवा. डीपीडीसीमध्ये अधिकाधिक कामे ही दुष्काळ निवारणाची घ्या. पालकमंत्र्यांनी कल्पकतेने स्थानिक स्तरावर काय निर्णय घेता येईल यावर लक्ष द्या. त्याचसोबत विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका.', असे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Drought: मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल

दरम्यान, फडणवीस सरकारने २६ सप्टेंबरला राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. ट्रिगर 1 लागू झालेल्या तालुक्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरीत तालुक्यात देखील दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून आणि विरोधकांकडून करण्यात येत होती. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी उर्वरीत तालुक्यात देखील दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी तालुक्यांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत कधी? विरोधकांचा सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com