anil bonde News  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राजकारण पेटलं; अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंमत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

Amravati News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. भाजप-शिवसेना नेत्यांनी सावरकर यांच्यावरील मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंमत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला आहे. (Latest Marathi News)

भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी अपमानास्पद बोलत आहेत. काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी सावरकर बद्दल बोलले होते तर त्यांच्या पुतळ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारले होते. मात्र काँग्रेसचे राहुल गांधी हे सावरकरांबद्दल वारंवार वादग्रस्त बोलत आहेत. तरी देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे बोलत नाही'.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या पुतळ्याला किंवा राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंमत आहे का? असा सवाल भाजप (BJP) नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला. (Maharashtra Political News)

'केवळ सत्तेसाठी लाचारी उद्धव ठाकरे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे सारखी हिंमत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली. भाजप खासदार अनिल बोडें यांच्या टीकनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Maharashtra News Live Update: विदर्भातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर; सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अभिजित दिपकेंची मागणी

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

EPFO On WhatsApp: EPFO चं WhatsApp चॅनेल! PF-पेन्शनचे अपडेट्स मिळणार थेट मोबाइलवर; जॉइन करण्याची A to Z प्रोसेस जाणून घ्या

Pune : पुण्यात दूध थेट १० रुपयांनी महागलं! भाव वाढण्यामागचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT