भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट Saam Tv
महाराष्ट्र

Suresh Dhas : सुरेश धसांकडून डॅमेज कंट्रोल, मुंडेंच्या भेटीनंतर मस्साजोगमध्ये, संतोष देशमुख प्रकरणात केला मोठा खुलासा

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष देशमुख हत्या प्रकरण आजही संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने उलटून देखील या प्रकणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याच कारणास्थ भाजप आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

सुरेश धस काय म्हणाले ?

मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर हातवर करून विश्वास दाखवला आहे. या प्रकरणातील महाजन आणि पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे. सायबर सेल मधील दोन तज्ज्ञांची एसटीमध्ये नियुक्ती व्हावी. आरोपींचे फोन कॉल कुणाला झाले आहेत? ते तपासले पाहिजे. मागील दोन महिन्यांपूर्वीचे सीडीआर तपासले पाहिजेत. पोलीस अधिकारी महाजन यांची बीडमध्ये नियुक्ती आहे, त्यांचे कामकाज केज पोलीस ठाण्यात कसे काय चालते? या दोन्ही पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी

कृष्णा आंधळे फार चतुर आहे. आरोपींचे मनोबल वाढविण्यासाठी लोक न्यायालयात येतात. कृष्णा आंधळेला अटक होणे गरजेचे आहे. रमेश घुले, दत्ता बिक्कड, दिलीप गीते, गोरख फड यांचे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करा. शासकीय वकील उज्वल निकम यांची यात नियुक्ती केली पाहिजे. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नक्की जाणार आहे. पोलिसांची देखील चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

पोलीस अधीक्षक बदलले, पण यंत्रणा तीच

चार्जशीट दाखल करण्यापूर्वी गावकऱ्यांनी ८ मागण्या मांडल्या आहेत. पोलिसांची देखील चौकशी करा. नितीन बिक्कड याने धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक केली. तो आरोपी कसा होत नाही? आरोपींना फरार करण्यात त्याचा वाटा आहे. सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या तर ग्रामस्थांचा विश्वास वाढेल. या मागण्या मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. जेल प्रशासनासंदर्भात देखील ग्रामस्थांनी मागण्या केल्या आहेत. जे मदत करत आहेत, ते जेल प्रशासनातील लोक निलंबित झाले पाहिजेत. पोलीस अधीक्षक बदलले असले तरी खालची यंत्रणा तीच आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

धस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

पोलीस दल आतापर्यंत आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालत होते. महादेव मुंडे प्रकरणाला 16 महिने झाले आहेत. मुंडे प्रकरणातील आरोपीने त्यांच्या कुटुंबाला धमकी दिली. म्हणजे हे किती खतरनाक लोक आहेत. देशमुख हत्या संदर्भात मी केज पोलीस ठाण्यात देखील जाणार आहे. पोलीस अधिकारी महाजन या ठिकाणी राहिलाच कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. ग्रामस्थांना मी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार नाही. त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रविवारी नागपूरला जाणार आहे. त्या वेळी त्यांच्याकडे या संदर्भात चर्चा करेल, असे ते म्हणाले.

...तर उपोषणाला बसू नका

पंकज कुमावत यांना ॲडिशनल एसपी म्हणून नियुक्ती द्यावी. कृष्णा आंधळेचे घरदार पोलिसांनी का आणले नाही? आमचा सुंदर माणूस तुम्ही हिरावून घेतला हा चटका मनाला लागला आहे. उद्याच मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे. ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर तुमच्या मागण्यावर सकारात्मकता दाखवली तर उपोषणाला बसू नका. आत्मक्लेष म्हणजे साधी गोष्ट नाही, त्यामुळे विनंती आहे. मी आता यापुढे कारवाई करूनच येणार अन्यथा येणार नाही, असे धस यांनी स्पष्ट केले.

जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट

जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. जेलमध्ये आरोपींना चहा, मटन कोण आणून देत आहे? आरोपींना मोठी बॅग कशासाठी आणि कोण नेऊन देत आहे? जे अधिकरी यात सहभागी असतील त्यांना निलंबित करावे, ही मागणी ग्रामस्थांची असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT