shivendra raje bhosale News  saam tv
महाराष्ट्र

समाजामध्ये जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे; राज्यपालांच्या वक्तव्यावरून शिवेंद्रराजे भडकले

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले चांगलेच काहीसे भडकलेले पाहायला मिळाले.

ओंकार कदम

Shivendraraje Bhosale News : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले काहीसे भडकलेले पाहायला मिळाले. 'समाजामध्ये जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे, अशा शब्दात शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना संदेश दिला. (Latest Marathi News)

भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य करून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्य कोणीच करू नयेत. पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तर करूच नयेत. यामुळे समाजामध्ये वाईट विचार पसरतोय. अशा वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतात'.

'छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून चर्चेमध्ये आणण्याचे जे प्रकार सुरू आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे. समाजामध्ये जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे. आपण काय बोलतो ? त्याचा मेसेज काय जातोय हे विचार करून बोलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य कोणीही करू नये, मी राजघराण्यातील सदस्य म्हणून सर्वांना आवाहन करतो आहे असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

काय म्हणाले होते राज्यपाल?

'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

Kolhapur Tourism : पश्चिम घाटातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT