भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह Saam Tv
महाराष्ट्र

भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive) असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे ट्विट (Tweet) करून दिली आहे.

हे देखील पहा-

मागील काही दिवसामध्ये आपल्या संपर्कामध्ये आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. नुकत्याच २८ डिसेंबर दिवशी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter session) राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथील रुग्णालयामध्ये (hospital) कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

२ दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना देखील कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यादेखील अधिवेशनामध्ये उपस्थित होते. यामुळे कोरोनाचे हे लोण आता आमदारांमध्ये (MLA) पसरते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. काल २९ डिसेंबर दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), पती सदानंद सुळे व त्यांची दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती.

सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. आपली आणि कुटुंबियांची प्रकृती स्थिर असून संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deadly Sleep Position: झोपण्याची ही पद्धत देईल मृत्यूला आमंत्रण, जाणून घ्या झोपण्याची योग्य पद्धत

Maharashtra News Live Updates: भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाकडून नोटीस

AUS vs PAK: पाकिस्तानचा ऐतिहासीक विजय! ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत रचला इतिहास

Bribe Trap : वीजपुरवठा जोडून देण्यासाठी २० हजाराची लाच; वायरमन एसीबीच्या ताब्यात

Shivaji Park : ठाकरेंच्या सभांना शिवाजी पार्कवर परवानगी नाही? मोठी अपडेट आली समोर, पाहा Video

SCROLL FOR NEXT