आपल्या नाकर्तेपणाचं सगळं खापरं कोरोनावर फोडायचं आणि…; राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र Saam T v
महाराष्ट्र

आपल्या नाकर्तेपणाचं सगळं खापरं कोरोनावर फोडायचं आणि…; राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे हे सतत महाविकास आघाडी सरकारसह नेत्यांवर टीका करत असतात. आता त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये अपयश आल्याचे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या या संकटामध्ये अनेकांनी आपले जवळचे लोक गमावल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्याकरिता सगळं खापरं कोरोनावर फोडायचं आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे. हे अत्यंत निंदनिय असल्याची टीका नितेश राणे यांनी यावेळी केली आहे. शिवाय कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि आगीच्या घटना यावरून देखील राणेंनी सरकारवर टीकास्र सोडले आहे. त्यांनी सांगितले की, दवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.

हे देखील पहा-

परंतु, परिस्थितीत पहिल्या फळीतील कर्मचारी, कोविड योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली आहे. त्यांच्या नशिबी मात्र आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलने करावी लागली आहेत. सरकार साधं विम्याचं कवच देखील कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकले नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणा झाले आहेत.

ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पुर्ण करता आला नसल्याचे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे. २६ जानेवारीपासून मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती.

परंतु, या कर्मचाऱ्यांचे अद्याप देखील लसीकरण झाले नाही. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे २ डोस झाले नाहीत. ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब असल्याची टीका राणेंनी या पत्रातून केली आहे. लसीकरणाविषयी प्रशासनामध्ये असलेल्या गोंधळावरून नितेश राणे यांनी टीका करताना आकडेवारीच मांडली आहे. त्यांनी सांगितले आहे की, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले आहेत.

यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जणांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यात केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच २ डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त १ डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी आणि उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच गोंधळ दिसून येत आहे.

पत्राच्या शेवटी आदित्य ठाकरे यांना उद्देशून नितेश राणे म्हणतात की तुमच्यापासून सत्य लपवले असेल, म्हणूनच मी तुम्हाला वास्तव निदर्शनास आणून देत आहे. पत्रात नितेश राणेंनी सांगितले आहे की, कालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे, की ही वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असणार आहे, म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छितो. जेणेकरून महानगर पालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्यांच्याबरोबर संधीसाधूपणाचे राजकारण तर करत नाही ना? असा प्रश्नही नितेश राणेंनी यावेळी ठाकरेंना विचारला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : रायगड पोलीस भरती लेखी परीक्षा कॉपी प्रकरण, दहा जण गजाआड

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT