Alleged call recording of BJP MLA Narayan Kuche triggers massive political controversy during Aurangabad municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

पोलीस बंदोबस्तात पैसे वाटू, भाजप आमदाराचे कॉल रेकाँडिंग?

BJP MLA Alleged Cash Distribution Call Recording: एका आमदारांच्या कॉल रेकाँडिगनं लोकशाहीचे धिंडेवडे निघालेत... पोलिस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटणार असल्याचं सांगणार हा आमदार नेमका कोण आहे? महापालिका निवडणुकीत आमदारानं लोकशाही कशी विकली?

Suprim Maskar

राडा, हाणामाऱ्या आणि आरोप-प्रत्यारोप आणि पैशांचा पाऊस...राज्यातील महापालिका निवडणुका यामुळे गाजल्या..पैशांच वाटप तर सर्रासपणे झालं..संभाजीनगरमधील भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आलीय.. कुचे यांची बहिण गंगाबाई भवरे या प्रभाग क्र . 24 मधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या... त्याचवेळी कुचे यांचा आपल्या कार्यकर्त्यांशी पैसे वाटपासंदर्भात झालेला हा संवाद ऐका.

दरम्यान ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचं आमदार नारायण कुचेंनी म्हटलं आहे तर ऑडिओ क्लिपमध्ये कुचेंशी बोलणाऱ्या अजय म्हस्के या वंचितच्या कार्यकर्त्यानं ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे, ज्या प्रभागात कुचेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय त्या प्रभागात वंचितचे चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. यावरून वंचितनं आमदार कुचेंविरोधात आंदोलन ही केलं होतं.

निवडणुकीत पैसे वाटप होणं, हे काही आता नवं राहिलेलं नाही... मात्र पैसेवाटपाचे आरोप होऊनही कुठलीच कठोर कारवाई राजकीय पक्षांच्या नेत्यांविरोधात किंवा कार्यकर्त्यांविरोधात केली जात नाही.लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवडणुक आयोग चौकशी कऱणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलंय..

डिस्क्लेमर: कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची सत्यता पडताळली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT