Builder alleges serious threats against BJP MLA Kisan Kathore, sparking political controversy in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

भाजप आमदाराची बिल्डरला जीवे मारण्याची धमकी; खुद्द सुपारी घेणाऱ्या गुंडाचं पोलिसांना पत्र

BJP MLA Threat : अंबरनाथमधील एका बांधकाम व्यावसायिकाने भाजप आमदार किशन कथोरे यांच्यावर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप केले आहेत. सुपारी घेणाऱ्या गुंडानेच पोलिसांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे.

Bharat Jadhav

  • भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर गंभीर आरोप

  • बिल्डरकडून जीवे मारण्याची धमकी आणि सुपारीचा दावा

  • कथित गुंडाने पोलिसांना पत्र दिल्याचा आरोप

अंबरनाथमधील एका बिल्डरनं भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार किसन कथोरे यांच्यापासून आपल्याल जिवाला धोका असल्याचा आरोप या बिल्डरनं केला आहे. इतकेच नाही तर आमदाराने ज्याला आपल्या मारण्याची सुपारी दिली आहे, त्याच गुंडाने पोलिसांना पत्र देऊन याची माहिती दिली आहे, असा दावा केला आहे. विश्वनाथ पनवेलकर असं या बिल्डरचे नाव आहे.

भाजप आमदाराने एजाज लकडावाला याला सुपारी दिली आहे. त्या लकडावालाने स्वतः पत्र लिहून ही माहिती ठाणे पोलीस आयुक्तांना दिली आहे, असा खळबळजनक दावा बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांनी केला आहे. अंबरनाथमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पनवेलकर यांनी पोलिसांनाच आम्हाला आता न्याय द्या, असे आवाहनही केले आहे.

बदलापूर पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी एजाज लकडावाला नावाच्या गुंडाच्या पत्राचा संदर्भ देत चौकशी सुरू असल्याचे सांगितल्याची माहिती पनवेलकर यांनी दिली आहे. आम्ही वारंवार जिवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगितल आहे. आता तर थेट पोलिसांनाच गुंड पत्र पाठवून आपल्याला सुपारी दिल्याचे सांगत असल्याचे पनवेलकर म्हणाले. मात्र तरीही आम्हाला पोलीस संरक्षण दिले जात नाही. आमच्या जागी राजकीय पुढारी असते तर त्यांना लागलीच झेड दर्जाची सुरक्षा मिळाली असती, असी खंतही पनवेलकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

पोलिसांवर राजकीय दबाव असून आम्हाला घराबाहेर पडणं अवघड झाले आहे. आमचे उद्योग डबघाईला आले आहेत. यापूर्वी घरावर गोळीबार झाला आहे. यात आमदार किसन कथोरे हेच प्रमुख आहेत, असा आरोप पनवेलकर यांनी केला आहे. आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहकार्य करतात पण स्थानिक पोलीस वरिष्ठांची दिशाभूल करतात. गुंड स्वतः पत्र लिहून देतो, मात्र तरीही पोलीस आरोपीचा जबाब घेत नाही, असेही पनवेलकर यावेळी म्हणाले.

आमदार कथोरेंनी आरोप फेटाळले

दरम्यान आमदार किसन कथोरे यांना विचारले असता ते म्हणाले, विश्वनाथ पनवेलकर हे स्वतः गुंड आहेत, खदानमाफिया म्हणून त्याची ओळख आहे. एजाज लकडावाला याचे आपण नावही ऐकले नसून त्याच्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे कथोरे म्हणालेत. मात्र वारंवार माझ्‌या नावाची बदनामी केली जात आहे. यापूर्वी ही विश्वनाथ पनवेलकर यांच्या विरोधात १०० कोटीच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; व्हिडिओ शूट होत असतानाही थांबला नाही, विकृत कृत्य कॅमेऱ्यात कैद

Maharashtra News Live Update: मुळशी तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी लावले डोंगरांना वणवे

आता जपान-कोरियात युद्ध पेटणार? किम जोंग यांनी डागले मिसाईल

Heart Attack Prevention: चाळीशी पार केलीत? या १० सवयींनी कमी करा हार्ट अटॅकचा धोका

Bihar New CM : कौन आइल बा...मुख्यमंत्री राजीनामा देणार, बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? शपथविधीची तारीख ठरली

SCROLL FOR NEXT