Gopichand Padalkar objectionable statement about Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Gopichand Padalkar News: शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; थेट अरे तुरेची वापरली भाषा

Gopichand Padalkar on Sharad Pawar: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने टीका करत असतात.

साम टिव्ही ब्युरो

Gopichand Padalkar on Sharad Pawar: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने टीका करत असतात. यावेळीही त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. यावेळी टीका करत असताना त्यांची जीभ घसरली. त्याचबरोबर त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)

रविवारी (४ जून) सोलापूरमध्ये मंद्रूप येथे धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख करत अरेरावीची भाषा केली आहे. त्याच्या या विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी पवारांनी मस्ती केली.यावर्षी पवार का नाही आला. पवार चार वेळा मुख्यमंत्री होता. बारा वर्षे केंद्रात मंत्री होता. तो पण आता होता मागं कधी होता मला माहिती नाही, असा एकेरी भाषेत उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला. (Maharashtra Political News)

'गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती. त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौंडी जागृत ठेवली पाहिजे', असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना केलं आहे.

जेजुरी देवस्थानमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थान आणि पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान हे होळकरांची जहागीरदारी आहे. जेजुरी संस्थान येथील अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार अशी पत्रिका आली. त्यावेळी मला कळले होते. काहीतरी मोठी गेम चालू आहे. मात्र पहाटे तरुणांना सांगून पुतळ्याचे मी उद्घाटन केले, असंही पडळकर म्हणाले.

रोहित पवार (Rohit Pawar) हे जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. रोहित पवार यांचा उल्लेख माकडा असा करत धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात तुला माहिती नाही का,तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांना लगावला. दरम्यान, पडकरांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT