Wardha News Saamtv
महाराष्ट्र

Wardha: पोहोचण्याआधीच उद्घाटन केल्याने आमदार संतापले! ठेकेदाराला शिविगाळ; मारायलाही धावले

इतकेच नव्हेतर संतापलेले भाजप (BJP) आमदार ठेकेदाराला मारायलाही धावले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास,वर्धा

Wardha: उद्घाटन करायला गेलेल्या कार्यक्रमाचे आधीच उद्घाटन झाल्याने भाजपा आमदार दादाराव केचे यांनी ठेकेदाराला शिविगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. आर्वी विधानसभा मतदार संघाच्या कारंजा तालुक्यातील दानापूरमध्ये ही घटना घडली आहे. यावेळी आमदारांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, कारंजा तालुक्यातील दानापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गावचे सरपंच काँग्रेसचे असल्याने त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना कार्यक्रमात बोलावले.

ते भूमिपूजन करुन गेले तोच आमदार केचे पोहचले. झाला प्रकार पाहून ते चांगलेच संतापले व त्यांनी कंत्राटदाराला शिवीगाळ केली. 

इतकेच नव्हेतर संतापलेले भाजप (BJP) आमदार ठेकेदाराला मारायलाही धावले. स्थानिकांनी त्यांना अडवल्यानंतर हा वाद संपला. मात्र यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावून या ठेकेदारचा मी जो पर्यंत पाहणार नाही बील काढायचं नाही लक्षात ठेवा, असा दमही दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केळीचे भाव कोसळले, अतिवृष्टीच्या संकटानंतर केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट

Dombivli Crime : डोंबिवलीत मोठा राडा! परागाच्या मुद्द्यावरून चाकू हल्ला, रिक्षा युनियन लीडरवर सपासप वार

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना बीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, कोणी दिला इशारा? VIDEO

Dia Mirza: दिया मिर्झाचा क्लासिकल फ्यूजन ड्रेस स्टाईल, या दिवाळीला तुम्हीही करा रिक्रिएट

Badnera Crime : बडनेऱ्यात ढाबा चालक, महिलेला मारहाण; पोलिसात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT