Satish bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: आलिशान गाड्यांचा ताफा, कोट्यवधींची प्रॉपर्टी, खोक्या भोसले रस्त्यावर येणार; सतीशची संपत्ती जप्त होणार?

Satish Bhosale Property Seizure Demand: फरार सतीश भोसले उर्फ खोक्याची प्रॉपर्टी कोट्यवधींच्या घरात आहे. त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता राम खाडे यांनी केली आहे.

Bhagyashree Kamble

भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेवर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, खोक्या अद्याप तरी पोलिसांच्या तावडीत काही सापडला नाही. त्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतात. खोक्या कधी पैसे उडवतो. तर, कधी कारमध्ये पैशांची बंडल ठेवतो तर, कधी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री. खोक्या जरी फरार असला तरी, त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

फरार सतीश भोसले उर्फ खोक्या याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी मागणी आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे केली आहे. सतीश भोसले याच्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी तसेच आलिशान गाड्या आहेत. त्यामुळे चौकशी करून प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे.

सतीश भोसलेची प्रॉपर्टी कोट्यवधींच्या घरात आहे. तसेच त्याच्याकडे अलिशान गाड्या आहेत. याबरोबरच तो पत्ते खेळण्याचा शौकीन आहे. यातून त्यानं लाखो रूपयांची कमाई केली आहे. अहिल्यानगर, आष्टी, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये तो पत्ते खेळायचा, अशी माहिती समोर आली आहे.

यासह राज्यात होत असलेल्या चोऱ्या, चोरी झालेले सोने यातून त्याने लाखांच्या घरात पैसे गोळा केले आहेत. यात आमदार सुरेश धस यांचा देखील समावेश आहे. धसांची देखील चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे. राम खाडे यांनी केलेल्या आरोपांवर आणि मागणीवर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत काय पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माणगाव येथील मुंबई गोवा महामार्गावरील नवीन पुलाला केवळ दहा दिवसांत पडले खड्डे

Bird Behavior: पक्षी घरट्यात सिगारेचे थोटके का ठेवतात? हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! माहीम रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशाला चाकूने भोसकलं; धक्कादायक कारण समोर

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?

Harshad Chopda: 'गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मला चीट...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT