Gram Panchayat Election Result 2022
Gram Panchayat Election Result 2022 Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar news : भाजपचा संगमनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; बाळासाहेब थोरातांच्या गावात विखे पाटील गटाने केली सत्ता काबीज

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat) निकाल आज जाहीर होत आहे. राज्यभरात राज्यातील बड्या नेत्यांना धक्के बसत आहे. अहमदनगरच्या जोर्वे गावात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. या गावात भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील गटाने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे जोर्वे गावातील ग्राम पंचायत निकालाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. (Latest Marathi News)

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या संगमनेर तालुक्यातील सर्व ३७ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. २६ जागांवर काँग्रेसने वर्चस्व मिळवलं आहे. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील ११ जागांवर भाजपाचा विजय झाला आहे.

विशेष म्हणजे थोरातांचे मूळ गाव असलेले जोर्वे येथे बाळासाहेब थोरात यांना धक्का देत भाजपच्या विखे गटाने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था थोरात गटाची झाली आहे.

तालुक्यातील तळेगाव दिघे, घुलेवाडी, निळवंडे, निंभाळे, कोल्हेवाडी या ग्रामपंचायतींमध्ये विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांना धक्का दिला आहे. तर विखे पाटील यांचे वर्चस्व असलेल्या निमगाव जाळी, उंबरी-बाळापूरमध्ये थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का देत सत्ता खेचून आणली आहे. मात्र राज्यात सत्तांतरानंतर कॉंग्रेस बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या संगमनेर तालुक्यात भाजपने घेतलेली मुसंडी लक्षवेधी ठरली आहे.

अहमदनगर जिल्हा

ग्रामपंचायत अंतिम निकाल खालील प्रमाणे

एकूण ग्रामपंचायत- 203

निकाल जाहीर :- 203

बिनविरोध :- 13

भाजप = 74

राष्ट्रवादी काँग्रेस = 68

काँग्रेस = 27

ठाकरे गट = 19

शिंदे गट - 1

इतर = 14

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

SCROLL FOR NEXT