Girish Mahajan Saam Tv
महाराष्ट्र

Girish Mahajan: खातेवाटपात होणाऱ्या बदलामुळे भाजपचे ‘संकटमोचक’ नाराज; फडणवीसांसमोर व्यक्त केली खंत

BJP minister : एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडे असणारी खाती काढून घेण्यात आली. या मंत्र्यांना त्यांच्याकडील खाती काढून त्यांना दुसरी खाती देण्यात आली. पण याच निर्णयावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली

Bharat Jadhav

(पराग ठोबळे, नागपूर)

Bjp Minister Girish Mahajan :

महाराष्ट्रातील अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. यामुळे मंत्रिमंडळातील बदल झाले. परंतु या बदलाचा फटका भाजपमधील नेत्यांना बसत आहे. खाती बदलल्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडील खाती काढून घेण्यात आली. मंत्र्यांना त्याऐवजी दुसऱ्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. या निर्णयावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. महाजन यांनी त्यांची खंत देवेंद्र फडणवीसांसमोर बोलून दाखवलीय. (Latest News)

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडे असणारी खाती काढून घेण्यात आली. या मंत्र्यांना त्यांच्याकडील खाती काढून त्यांना दुसऱ्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. पण याच निर्णयावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपुरात आज खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रमात करण्यात आला होता. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी ही नाराजी व्यक्त केली. खाते बदल आणि पर्यटनात महाराष्ट्र पिछाडीवर आल्यावरूनही महाजन यांनी नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान त्यांच्या नाराजीनंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लगेच प्रतिक्रिया देत त्यांना आश्वस्त केलं. “पर्यटनाला इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे. पूर्वी राज्यांमध्ये आपण दोन नंबरवर होतो. आता नऊव्या, दहाव्या नंबरवर आहोत. आपल्यापुढे काश्मीर, केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश पुढे जात आहेत. विदर्भात फॉरेस्ट आहे. अनेक पर्यटनस्थळ आहेत. तरीसुद्धा आपण मागे आहोत याचा विचार करण्याची गरज असल्याचं गिरिश महाजन म्हणाले.

माझ्याकडे तीन सेक्रेटरी बदललेलेत. त्यामुळे कसं काम करावं हे मला कळत नाही. तीन वर्षात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहे. अडचणी भरपूर आहेत. अजून ७-८ महिने हे खातं माझाकडे ठेवलं तर मला काहीतरी करता येईल, असं मला वाटतं”,असं म्हणत गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. गिरीश महाजन एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे आणखी मोठं वक्तव्य केलं. “आमच्याकडे मित्र वाढले, पार्टनर वाढले की मग खाते बदलतात. त्यांच्या डिमांडप्रमाणे खातं बदलतात, अशीही नाराजी महाजनांनी व्यक्त केली.

त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी त्यांची नाराजी दूर केली. गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका पुढच्या काळात तुमच्या खानदेशमध्ये सुद्धा हा कार्यक्रम नितीनजी करतील. तुम्ही जे सांगितलं ते लक्षात घेत आता तुम्हीच परमनंट पर्यटनमंत्री आहेत. त्यामुळे तुम्हाला उत्तर महाराष्ट्रात विदर्भात जिथे वाटते तिथे पर्यटन वाढवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ नितीनजींनी तुम्हाला पर्यटनाच्या संदर्भातला संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT