Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: 'मुंबई सांभाळता आली नाही, त्यांनी नागपूरच्या गोष्टी करू नये'; भाजपचा आदित्य ठाकरेंना टोला

Maharashtra Political News: 'मुंबई सांभाळता आली नाही, त्यांनी नागपूरच्या गोष्टी करू नये, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात

Chandrashekhar Bawankule on Aaditya Thackeray:

नागपुरात काल पावासामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. या मुसळधार पावसामुळे नागरिकांचं कोट्यवधींचं नुकसान झालं. नागपूरच्या पूरपरिस्थीवरून आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मुंबई सांभाळता आली नाही, त्यांनी नागपूरच्या गोष्टी करू नये, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ' 110 मिलिमीटर पाऊस दोन तासात पडतो. त्यावेळी जगातल्या कुठल्याही शहरात ही परिस्थिती निर्माण होते. नागपुरात तर फार चांगली व्यवस्था आहे'.

'नागपूर शहर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे बदललं आहे. मात्र, त्यांचं या शहरासाठी शून्य योगदान आहे, त्यात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या लोकांचा सामावेश आहे. तर आदित्य ठाकरे यांना नागपूर वर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी एक रुपयाही नागपूर शहरावर खर्च केला नाही,अशी टीका बावनकुळे यांनी केली.

'नागपूर आम्ही सांभाळत आहोत. ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही, त्यांनी नागपूरच्या गोष्टी करू नये, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे लोकसभेसाठी काही नावाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.'आमच्या पक्षात केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यामध्ये चर्चा झाल्यावर निर्णय होतो. त्यामुळे या फक्त अफवा असून त्या पसरवण्यात आल्या आहेत. असा कुठलाही निर्णय रस्त्यावर होत नाही. केंद्रीय पार्लमेंट बोर्ड जेव्हा निर्णय करेल, तेव्हाच त्याला अंतिम समजावं, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी जळगावातून उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि मुंबईतील एका जागेसाठी माधुरी दीक्षित यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा होती. तर धुळ्यातून प्रतापराव दिघावकर यांच्या नावाची चर्चा होती. या सर्व राजकीय चर्चांवर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT