बीडच्या परळीतून मोठी बातमी हाती आली आहे. पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर कारवाई केल्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)
काय आहे प्रकरण?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी धाड टाकून काही कागदपत्रे तपासले होते. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले.
काल त्यानंतर औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत.
केंद्रीय जीएसटी आयोगाचे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिशीला प्रत्युत्तर न दिल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्यांनी या कारखान्याला अचानक भेट देत काही कागदपत्रे हस्तगत केली होती.
या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून १९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे समजते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.