
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची दुसरी सुनावणी उद्या विधानसभेत पार पडणार आहे.
विधानसभेत आमदार अपात्र प्रकरणाची पहिली सुनावणी 14 सप्टेंबर रोजी झाली. त्यानंतर आता या प्रकरणाची दुसरी सुनावणी सोमवारी घेतली जाणार आहे. या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची विधानसभेत उद्या दुसरी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी उद्या दुपारी तीन वाजता होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची पहिली सुनावणी १४ सप्टेंबर रोजी झाली. त्यानंतर सोमवारी या प्रकरणाची दुसरी सुनावणी घेतली जाणार आहे.
विधानसभेत उद्या होणारी सुनावणी एक प्रकारे नियमित सुनावणी आहे. तरी या सुनावणीत या प्रकरणाच्या प्रक्रियेची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणातील सुनावणीचं वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. त्या वेळापत्रकानुसार या प्रकरणातील सुनावणी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेत उद्या होणाऱ्या सुनावणीत सर्व आमदारांना हजर राहण्याची आवश्यकता नसणार आहे. मात्र, त्या-त्या गटाच्या वकिलांकडून उद्याच्या सुनावणीमध्ये बाजू मांडली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये मागील चार महिन्यांमध्ये नेमक काय केलं, याचा तपशील सादर करावं लागणार आहे.
या प्रकरणातील मागील सुनावणी 14 सप्टेंबरला झाल्यानंतर शिवसनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे एकमेकांना देण्यास सांगितले होते. शिवाय, दहा दिवसांमध्ये याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शिंदे गटातील आमदारांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला होता.
मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौरा करत काही कायदे तज्ज्ञांचा या सगळ्या प्रकरणात सल्ला घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी अधिक विधानसभा अध्यक्षां समोर होणाऱ्या या प्रकरणातील सुनावणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.