महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते ‘रावण पब्लिशिंग हाऊस’ प्रकाशित कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा, कवितांचे प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. सध्याचं राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. आजची देशाची आणि महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मी राजकारणी म्हणवून घेत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. (Latest News)
ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतना राज ठाकरे यांनी कुसुमाग्रजांचे कौतुक केलं. महाराष्ट्रात अनेक मोठ्या लोकांचा जन्म झाला आहे. पण आपण आपल्याच लोकांना मोठं करत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सध्याची राजकीय स्थितीवर त्यांनी परत एकदा नाराजी व्यक्त केली. आजचं वातावरण रोजच्या रोज गडूळ होत चाललय. भविष्यातील पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहोत. तसेच आपण कोणाला मतदान द्यावं, हे जनतेला कळलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
साहित्यिक, कवी यांनी राजकीय वातावरणावर बोलायला हवं. कवींनी याबाबत बोलायला सुरूवात केली तर त्यांचेही महत्व वाढेल. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपले मराठी साहित्य दुसऱ्या भाषेत आले पाहिजे. आपली संस्कृती दुसऱ्या देशाला समजायला पाहिजे, मतही त्यांनी यावेळी मांडलं. भाषण करताना राज ठाकरे यांनी कुसुमाग्रज यांची कविता वाचली. यावेळी त्यांनी भारत- इंडिया वादावर उपरोधिक टीका केली. इंडिया, भारत, हिंदुस्तान तिन्ही आपल्याला बोलायला काही लागत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
कुसुमाग्रजांची कविता राजकीय लोकांना समजली नाही. ती कविता निदान जनतेला तरी समजली पाहिजे. मी चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी जांभळासारखं टपकतो, असं म्हणत त्यांनी विरोधात्मक टिप्पणी केली. हे स्पष्ट करू सांगताना असताना राज ठाकरेंनी किशोरी आमोणकर यांच्या पुस्तकं प्रकाशनाचा किस्सा सांगितला. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशनदेखील माझ्या हस्ते झालं होतं.
त्यावेळी मी आमोणकरांना म्हटलं तुम्ही चुकीच्या माणसाला बोलावताय. विचार करा की आमोणकरांचं पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. आम्ही चुकीच्या जागी जांभळासारखे जाऊन टपकतो, असं राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.