Sujay Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

दोन्ही ठाकरेंनी तमाशा बंद करावा; खासदार सुजय विखेंचा हल्लाबोल

गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विनोद जिरे

बीड: महाराष्ट्र नव निर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (Shivsena) यांच्या सभेवरुन आता भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे. विखे पाटील यांनी आज बीड येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. आज परळीतील गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी सुजय विखे पाटील यांनी संवाद साधला.

महाराष्ट्रातली शेतकऱ्यांचे दुर्दैव, शेतकऱ्यांचे (Farmer) प्रश्न बाजूला ठेवून, राज्यातील राजकारण वेगळ्या स्पर्धेकडे निघाले आहे. आज या नेत्याची ह सभा, उद्या ती सभा, मग परत उत्तर सभा. मला वाटते शेतकऱ्यांचे वाटोले जरी झाले तरी त्यांच्याकडे पाहायला कुणाला वेळ नाही, असा नाव न घेता टोला विखे पाटील यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.

'आज सगळीकडे राजकारण सुरू आहे, राजकारणापलीकडे जाऊन कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे आता हा सगळा तमाशा बंद करावा, सभांवर बंदी आली पाहिजे. असे म्हणत खासदार सुजय विखे पाटील यांनी, औरंगाबाद येथे झालेल्या मनसेच्या आणि शिवसेना सभेवरुन, दोन्ही ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. ते परळी येथील गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Fraud : शहापूरमध्ये मोफत शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली, डॉक्टर घटनास्थळावरून गायब

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT