sudhir mungantiwar Saam Tv
महाराष्ट्र

भाजपच्या बैठकीत खलबतं! बंडखोर आमदार म्हणजे २४ कॅरेट शिवसैनिक, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या घडामोडींवर मोठं विधान केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास ५० समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकवून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवलीय. महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्ष जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे सरकारने (mva government) एकमेकांविरोधात केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने सर्वपक्षकारांना नोटीसा बजावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नेत्यांसोबत बैठक घेतली. महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्यासाठी भाजपने बैठक घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी सत्तास्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली नसल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. बंडखोर आमदार २४ कॅरेट शिवसैनिक आहेत. बंडखोर आमदार स्वतःला बंडखोर मानत नाहीत ते स्वतःला शिवसैनिक समजत आहेत, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

मुनगंटीवार यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर विधिमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आकलन केले गेले. महाराष्ट्रा समोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भाजपची भूमिका ठरवली जाईल. भाजपा सध्या वेट अँड वॉच या भूमिकेत आहे.अविविश्वास ठरावाची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.जसजसे प्रस्ताव येथील त्यानंतर पुन्हा भाजपची कोअर कमिटीचीटीची बैठक होईल. रोजच्या घडामोडींवर भाजपचे लक्ष आहे.

बंडखोर आमदार स्वतःला बंडखोर मानत नाहीत ते स्वतःला शिवसैनिक समजत आहे. बंडखोर आमदार २४ कॅरेट शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही.आम्हाला आज तरी फ्लोर टेस्ट मागण्याची गरज वाटत नाही. भाजपा बैठकीत शिवसेनेच्या फूटीवर चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली,त्यावरही चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी अविश्वास ठरावची मागणी केली आहे. सत्ता स्थापन करण्यासंदर्भात अद्याप चर्चा झाली नाही. मी कुठल्याच शिवसेनेच्या आमदारांना बंडखोर समझणार नाही. प्रस्ताव आल्यानंतर भाजप बैठकीत विचार करण्यात येईल.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT