बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकट्याचे नसून ते लोकनेते आहेत - छत्रपती संभाजीराजे

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद वाढला असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी या संघर्षात उडी घेतली आहे.
balasaheb Thackeray And  Sambhajiraje Chhatrapati
balasaheb Thackeray And Sambhajiraje Chhatrapatisaam tv
Published On

विनोद जिरे

बीड : दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव वापरण्यावरुनही एकनाथ शिंदे गटावर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद वाढला असतानाच आता छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी या संघर्षात उडी घेतली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांचे नावं घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, असं विधान संभाजी राजे यांनी केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. बीडच्या गेवराई शहरातील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

balasaheb Thackeray And  Sambhajiraje Chhatrapati
Maharashtra Politics Live : महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल - नाना पटोले

छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, बाळासाहेब हे कुणा एकट्याचे नसून ते लोकनेते आहेत. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. ज्यांच कुणांचं सरकार करायच असेल त्यांनी सरकार करावं. मात्र शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवावेत.

एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि महाविकास आघाडी सरकार (mva government) यांच्यातील संघर्ष सुप्रीम कोर्टाता पोचला असून ११ जुलैला यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने सर्व पक्षकारांना नोटीसा बजावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरु आहेत.

balasaheb Thackeray And  Sambhajiraje Chhatrapati
'विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्तेच; बंडखोरांनी काय झाडी, डोंगर, हाटील पाहावे'

बंडखोर आमदारांनी बाळासाहेबांचे नाव वापरू नका. तुमच्या बापाचे नाव वापरा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं होतं. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com