Kagal Vidhan Sabha Hasan Mushrif Vs Samarjitsinh Ghatge:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेला 'तुतारी' घेऊन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकणार? समरजित घाटगेंनी स्पष्टच सांगितलं; महायुतीची 'धाकधूक' वाढली!

Kagal Vidhan Sabha Hasan Mushrif Vs Samarjitsinh Ghatge: समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबतचा दावा फेटाळला असला तरी अपक्ष लढण्याबाबत विधान केल्याने महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. ५ ऑगस्ट २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समरजितसिंह घाटगे यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या बातम्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर आता स्वतः समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार फोडणार फडणवीसांचा मोहरा?

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार यांनी डाव टाकायला सुरूवात केली आहे. कागल विधानसभा मतदार संघात समरजितसिंह घाटगेंच्या हातात तुतारी देऊन कागलमधून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आव्हान देण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यासाठी समरजितसिंह घाटगे यांच्याशी संपर्कही साधण्यात आला, मात्र त्यांच्याकडून हा प्रस्ताव अद्याप स्विकारला नसल्याचे सांगण्यात येत होते. या वावड्यांवर आता स्वतः समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

समरजित घाटगेंचे स्पष्टीकरण!

या चर्चांवर बोलताना " मी महायुतीतच आहे. माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात असून विधानसभेसाठी माझी तयारी झाली आहे. त्यामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. वेळ पडल्यास अपक्ष लढेन पण दुसरीकडे जाणार नाही, वेळ आल्यावर मी बाईट देऊन माझी भूमिका स्पष्ट करेन," असे म्हणत चर्चांना फुलस्टॉप दिला आहे.

महायुतीचे टेन्शन का वाढलं?

परंतु समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबतचा दावा फेटाळला असला तरी अपक्ष लढण्याबाबत विधान केल्याने महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. कागल विधानसभा सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असल्याने जागा वाटपावरुन भाजप- राष्ट्रवादीत वाद रंगण्याची शक्यता आहे. तसेच समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढण्यास राष्ट्रवादीलाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT