Mahrashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Mahrashtra Political News: कोण रोहित पवार? काय त्यांची पात्रता? मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हल्लाबोल

भाजप नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Ravindra Chavan News: भाजप नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार?.. काय त्यांची पात्रता आहे, अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

'गांधी हा एक विचार आहे, तो विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं, असं आवाहन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला केलं होतं.

रोहित पवार यांच्या आवाहनावर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार ? काय त्यांची पात्रता आहे? असा सवाल करत चव्हाण टीकास्त्र सोडलं.

'रोहित पवार यांच्याबद्दल काय बोलायला पाहिजे. बोलण्याच्या पात्रतेचा तो माणूस नाही. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही, त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशीही टीका चव्हाण यांनी केली.

भाजप शिवसेनेची डोंबिवलीत सावरकर गौरव यात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला .या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरात भाजप शिवसेनेकडून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ,खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शेकडो स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमीनी सहभाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार गोपीचंद पडळकररांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर गंभीर टीका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगा प्रशिक्षकाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Madhubhai Kulkarni : PM मोदींना राजकारणात आणणारे मधुभाई कुलकर्णी यांचं निधन; छत्रपती संभाजीनगरात घेतला अखेरचा श्वास

Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, संतापलेल्या बापाने तरुणाला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; दीड वर्षांनंतर...

SCROLL FOR NEXT