Ajit Pawar News: ...तेव्हा गौरव यात्रा का काढल्या नाही? अजित पवारांचा भाजप-शिंदे गटाला रोकडा सवाल

'तुमच्या नेते, आमदारांकडून महापुरुषांचा अवमान केला गेला. त्यावेळी गौरव यात्रा का काढल्या नाही? असा सवाल अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटाला केला.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSaam tv
Published On

Ajit Pawar News : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तव्य केल्याने याच्या प्रत्युत्तरात शिवसेना शिंदे गट-भाजपने 'सावरकर गौरव यात्रा' राज्यभर आयोजित केली आहे. या यात्रेवरून अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 'तुमच्या नेते, आमदारांकडून महापुरुषांचा अवमान केला गेला. त्यावेळी गौरव यात्रा का काढल्या नाही? असा सवाल अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटाला केला. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर 'वज्रमूठ सभा' होत आहे. सांस्कृतिक मंडळ मैदानावर या सभेला सुरूवात झाली. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महाविकाआघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित आहेत.

Ajit Pawar News
Ashok Chavan News : उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस मी पाहिला नाही; अशोक चव्हाणांकडून तोंडभरून कौतुक

महाविकास आघाडीची जाहीर 'वज्रमूठ सभे'तून अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी केवळ 13 मिनिटे दिली. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अवहेलना केली नव्हती. हे मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करतात'.

'सत्तेतील नेते, आमदारांनी महापुरुषांचा अवमान केला गेला. त्यावेळी यांनी गौरव यात्रा का काढल्या नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला. त्यावेळी मात्र तुम्हाला ते थांबवता आलं नाही. ही दुटप्पी भूमिका आहे. आमचा सावरकरांची गौरव यात्रा काढायला विरोध आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar News
Maharashtra Politics : मविआच्या वज्रमुठ सभेला नाना पटोलेंची ऐन वेळेवर दांडी; काय आहे कारण?

'राज्य सरकार नंपुसक आहे, हे मत व्यक्त केले गेले, आम्ही म्हणत नाही. कोर्टाने हे सांगितले आहे. तर तुमच्यात हिंमत आहे, तर सावरकरांना भारतरत्न देऊन टाका. आमचा विरोध नाही, असेही अजित पवार म्हणाले.

'काही जण निव्वळ वातावरण खराब करत आहेत, आज बेरोजगारी वाढली आहे. या वातावरणमुळे उद्योग येण्यास अडचणी येत आहेत, अशी टीका देखील अजित पवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com