
Ashok Chavan News : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेतून राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. आजच्या सत्ताधाऱ्यांनी आमदारांची फोडाफोडी केली. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. आमदार गेले, पक्ष फोडला, चिन्हही गेलं अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची करणारं सरकार सध्या सत्तेत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर 'वज्रमूठ सभा' होत आहे. सांस्कृतिक मंडळ मैदानावर या सभेला सुरूवात झाली. या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महाविकाआघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित आहेत. (Maharashtra Political News)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐनवेळी वज्रमुठ सभेकडे पाठ फिरवली आहे. नाना पटोले यांची तब्येत बरी नसल्याचं काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, वज्रमुठ सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
उद्धव ठाकरे यांच्यासारखा एवढा भला माणूस मी पाहिला नाही. मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न, निर्णय घेताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत कधी वेगळी भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या काळातही त्यांची भूमिका सकारात्मक होती. असं अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.
'गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे'
पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ही विराट सभा पाहिल्यावर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही. ही मन की बात नाही, ही दिल की बात आहे. देवगिरी किल्ल्यासारखी मजबूत स्थिती महाविकास आघाडीची आहे. कितीही मोठा भूकंप झाला तरी जे राहिले ते एकसंघ आहेत. गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.