Balasaheb Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Hindutva: 'ती वेळ आली तर पक्ष कार्यालयास कुलुप लावीन पण काॅंग्रेसशी हातमिळवणी नाही'

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसैनिकांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : एक काळ असा होता की महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या मदतीने सरकार चालवत होते. मात्र आता दोन्ही पक्ष एकमेकांवर सतत टीका टिप्पणी करत आहेत. भाजपवर हल्लाबोल करताना शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपसोबत राहून आम्ही आमची २५ वर्षे वाया घालवली अशी टीका नुकतीच केली. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या वक्तव्याचा भाजपने (bjp) देखील तत्काळ समाजार घेत केवळ मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते राम कदम म्हणाले, "हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी ठाकरेंनी विचार करायला हवा की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या (balasaheb thackeray) विचारसरणीवर चालत आहेत का? बाळासाहेबांनी कधीही त्यांच्या तत्वांशी तडजाेज केली नाही. बाळासाहेबांनी आमचा पक्ष कधीच काॅंग्रेसबराेबर (congress) हातमिळवणी करणार नाही असे ठणकावून सांगितलं हाेते. तशी परिस्थिती उद्भवली तर वेळ प्रसंगी पक्ष कार्यालयाला कुलूप लावीन असेही ते म्हटलं हाेते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपण खरंच पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालवत आहाेत का असं हिंदुत्वावर बाेलताना तपासावं असा राेख आमदार राम कदम यांचा दिसून आला आहे.

रविवारी भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला. म्हणूनच आम्ही भाजप सोडला, हिंदुत्व नाही. भाजपचा अर्थ हिंदुत्व नाही. शिवसेनेने भाजपसोबत 25 वर्षे युती केली, पण ती वाया गेली असे म्हटलं हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त

Vastu Tips Of Broom: झाडूविषयी हे नियम तुम्हाला माहित आहे का?

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने झोडपलं

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाच्या रात्री मीठाचा हा उपाय जरूर करा, घरात नांदेल सुख- शांती

Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

SCROLL FOR NEXT