अमित शाह सहकार मंत्री झाले Saam Tv
महाराष्ट्र

अमित शाह सहकार मंत्री झाले आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली - विखे पाटील

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज नगरच्या दौऱ्यावर आहेत. वरानगरला अमित शाह यांच्या उपस्थितीत सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडतोय.

अभिजीत सोनावणे

अहमदनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज नगरच्या दौऱ्यावर आहेत. वरानगरला अमित शाह यांच्या उपस्थितीत सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडतोय. केंद्रात प्रथमचं स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) पहिल्यांदाचं प्रवरानगरला सहकार परिषदेसाठी आले आहेत. यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शाहांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. BJP Leader Radhakrishna Vikhe Patil Praises Central Minister Amit Shah During First Co-operative Council At Ahmednagar

आपण सहकार मंत्री झालात आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली - विखे पाटील

"सर्वप्रथम दत्त जयंतीच्या शुभेच्छा. सहकाराच्या पंढरीसाठी आज सोन्याचा दिवस आहे. सहकार पंढरीत अमित शाह यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कोव्हिडनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी सभा भरतेय. आपण सहकार मंत्री झालात आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली. देशासमोर प्रवरा कारखाना हे मॉडेल आहे. मधल्या काळात सहकार सहकारी चळवळीची पीछेहाट झाली. मात्र, आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल", असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शाहांवर स्तुतीसुमनं उधळली.

राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले, पण केलं काहीच नाही - विखे पाटील

"राज्यातील सहकारी कारखानदारीचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होतंय. अनेकांनी खाजगी कारखाने काढले आणि सहकाराला दोष दिला. या सगळ्या चळवळीला आधार देण्याची आवश्यकता आहे. मोदींनी सहकाराला जीवदान दिलंय. राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले. पण, सहकाराच्याबद्दल फक्त बोलले, केले काहीच नाही", असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीने केळीची बाग उध्वस्त,संतप्त शेतकऱ्याने कोयता हातात घेऊन बाग तोडली

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

Snake Fact: नाग आणि नागीणमध्ये फरक काय? कसा ओळखायचा?

Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा, सोप्या पद्धतीने तयार करा मजेशीर स्नॅक

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

SCROLL FOR NEXT