Pankaja Munde Shivshkti Daura Saamtv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात! 'शिवशक्ती' दौऱ्याची घोषणा; १० जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची घेणार भेट

Pankaja Munde Shivshkti Daura: पंकजा मुंडे यांच्याकडून 'शिवशक्ती' दौऱ्याची घोषणा करण्यात आली असून ११ पेक्षा जास्त जिल्ह्यांचा दौरा त्या करणार आहेत.

Gangappa Pujari

Pankaja Munde News: मागील दोन महिन्यांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून ब्रेक घेतला होता. २ महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून 'शिवशक्ती' दौऱ्याची घोषणा करण्यात आली असून ११ पेक्षा जास्त जिल्ह्यांचा दौरा त्या करणार आहेत. हा दौरा फक्त देवदर्शनासाठी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडे पुन्हा मैदानात...

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ११ दिवसांत राज्यातील १० पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा सुरू करणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्या विविध तिर्थस्थळांना भेट देणार असून हा दौरा देव दर्शनापुरता मर्यादित असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या दौऱ्याला शिवशक्ती (ShivShakti) असेही नाव त्यांनी दिले आहे.

शिवशक्ती दौऱ्याची घोषणा...

तब्बल ५ हजार किलोमीटरचा प्रवास या दौऱ्याच्या माध्यमातून त्या करतील. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati SambhajinagarP येथील घृष्णेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन या शिवशक्ती दौऱ्याला सुरूवात होणार आहे. यानंतर त्या नाशिक (Nashik), नगर , पुणे, सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यातील मंदिरात देवदर्शन करणार आहेत.

१० जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची घेणार भेट...

दरम्यान, पंकजा मुंडे यांना पक्षातून डावलले जात असल्याचे वारंवार बोलले जात आहे. त्यामुळेच या शिवशक्ती दौऱ्याला विशेष महत्व आहे. हा दौरा देवदर्शनासाठी असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले असले तरी दौऱ्यानिमित्त त्या कार्यकर्त्यांशी भेट घेवून आपली भूमिका जाहीर करु शकतात.. अशीही शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Leader: दिवसाढवळ्या कार अडवली, खेचत बाहेर काढलं अन्...; महिला नेत्याच्या अपहरणामुळे खळबळ

IAS Transfers: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रशासनात उलथापालथ; जिल्हाधिकाऱ्यांची बदली, दोन IAS अधिकारी आले!

Karanji Recipe : दिवाळीच्या फराळाला सुरूवात करा, 'अशी' बनवा खुसखुशीत करंजी

Maharashtra Live News Update : गौतमी पाटीलने धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT