Pankaja munde
Pankaja munde  saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde|मी कोणासमोरही झुकणार नाही; पंकजा मुंडेंचा नेमका रोख कोणाकडे ?

विनोद जिरे

Pankaja Munde News : राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे गटातील ९ तर भाजपमधील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. मात्र, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी उघड झाली आहे. मी थकणार नाही, मी थांबणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही, अशा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिला आहे. परळीमधील पंकजा मुंडे यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत असून राजकीय वर्तुळामध्ये याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

'गंभीर होऊन घरी बसणाऱ्या पैकी मी नाही, मी डाव्या बाजूला गेले तर तुम्ही माझ्या सोबत आहेत का ? संघर्षाला मी घाबरत नाही, संघर्षाचा वसा माझ्या रक्तातच आहे. संघर्ष केल्याशिवाय नावच होत नाही. सध्या चर्चा कुणाची आहे, संघर्षाची चर्चा आहे. मी थकणार नाही मी थांबणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'पक्षातील नेते फिरून फिरून मला 'परळी सांभाळा' असं म्हणतात. झाली एकदा चूक, ती किती महागात पडली, मी कमी पडली असेल, मात्र त्याची जाणीव करून दिली जात आहे. मुंडे साहेबांच्याही वाट्याला देखील पराभव आला होता, तो पराभव माझ्या देखील वाट्याला आला आहे. त्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. जोपर्यंत मी मनातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझ्या केसाला देखील धक्का लागणार नाही. तिरंगी लढत झाली असती तर सीट लागली असती'.

'संघर्षासाठी माझा पाठीचा कणा कधीही झुकत नाही. झुकून गंभीर होऊन घरी बसणाऱ्या पैकी मी नाही, माझ्याबरोबर तुम्ही आहेत ना, मी उजव्या बाजूला गेले, डाव्या बाजूला गेले, वर गेले किंवा खाली गेले तर माझ्या सोबत आहेत ना, अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली.

'लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना संपूर्ण आयुष्यात साडेचार वर्ष सत्ता मिळाली म्हणून थांबले का साहेब, कोणासमोर झुकले का साहेब, त्याचप्रमाणे मी थकणार नाही, मी थांबणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Today's Marathi News Live : हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

SCROLL FOR NEXT