Kirit Somaiya news in Marathi Saam Tv
महाराष्ट्र

Kirit Somaiya Viral Video Case: किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात मोठी अपडेट! 'तो' व्हायरल व्हिडिओ खरा; गुन्हे शाखेतील सूत्रांची माहिती

Maharashtra Politics News: काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी...

Kirit Somaiya Video: काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली असून तो व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून मिळाली आहे. (Maharashtra Politics)

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनेने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही चांगलेच गाजले होते.याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे.

व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचं आढळलं आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.

ठाकरे गटाने केले होते गंभीर आरोप...

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप लावले होते. तसेच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT