
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी मतदान संपण्यापूर्वी 48 तास म्हणजेच सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू होत आहे. या कालावधीत दृकश्राव्य माध्यमे ( टेलिव्हिजन ,केबल नेटवर्क ,रेडिओ, सोशल मीडिया) यावर शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास मनाई आहे. राजकीय जाहिराती,कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी.
दिपक केसरकर यांच्यासाठी वृषाली शिंदे याचा सावंतवाडी शहरात प्रचार करत आहेत. सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला असल्याचं वृषाली शिंदे म्हणाल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ह्यातच कागल तालुक्यात जैन्याळ गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या फोटो असलेल्या पॅम्पलेटवर करणी करण्याचा प्रकार आढळला आहे. याठिकाणी तांदूळ, नारळ, ब्लाउज पीस, अर्धा कापलेला लिंबू, अंगारा असे साहित्य रविवारी सकाळी फिरावयास गेलेल्या नागरिकांना आढळले.
पहिला रोड शो हा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी होणार आहे. तर दुसरा रोड शो हा मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्यासाठी होणार आहे. बंटी शेळके यांच्यासाठी होणारा प्रियंका गांधी यांचा रोड शो हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात होणार आहे.
- मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभगृह नेते दिलीप दातीर यांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा
- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना दिलीप दातीर यांचा पाठिंबा
- दिलीप दातीर माजी नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते
- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दिलीप दातीर होते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक
- मनसेने दिलीप दातीर यांना उमेदवारी न दिल्याने होते नाराज
- नाराज असलेल्या दिलीप दातीर यांनी घेतला भाजप उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय
- राज्यभरात आज प्रचाराचा सुपर संडे
- बाईक रॅली, पदयात्रा, मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर उमेदवारांचा भर
- प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास उरल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची लगबग
भाजपा नेते स्वर्गीय विलासजी मोहोळ यांच्या स्मरणार्थ एनडीए मैदान येथे साईनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने दोस्ती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उपस्थित राहून चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी भाजप नेते कैलास मोहोळ यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रचाराच्या तोफा थंडावायला अवघे काही तास उरले असताना मुख्यमंत्र्यांच्या पत्राची चर्चा
प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप करताना उत्साहाच्या भरात आपला तोल ढासळू देऊ नका
कोणताही अपशब्द अपमानास्पद वक्तव्य करू नका, सरकारच्या विकास कामावर बोला
उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण लक्षात ठेवून शहाणपणाने वागा
महिलांबाबत बोलताना त्या पुरूषांबाबत तुलनेत कमी नाहीत याची जाणीव ठेवा
महिलांचा अपमान होईल असे कोणतेही वक्तव्य करू नका.
प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वक्तव्यांना उत्तर देताना तोल जाऊ देऊ नका. त्यांच्यावर अर्वाच्च भाषेत बोलण्यापेक्षा संयमाने त्यांचे मुद्दे खोडून काढा
विरोधकांच्या अपशब्दाला उत्तर म्हणून अपशब्द वापरल्यास त्याच्या डावपेचांना आपण बळी पडू आणि लोकांसमोरआपली चुकीची प्रतिमा उभी राहिल
अडिच वर्षाच्या आपल्या कामगिरीवर आपल्याला विजयाचा कळस चढवायचा आहे.
वाशिम कडून हिंगोली कडे जाणाऱ्या भरधाव बसने एका दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला .. राजगाव ओव्हर ब्रिज खाली घटना घडली असून ब्रिज खालून जाणाऱ्या दुचाकीला एसटी बसने फरफटत 50 फूट नेले त्यामुळे नागरिकाचा संताप पाहायला मिळाला.
शरद पवार आज करमाळा आणि माढा दौऱ्यावर आहेत. करमाळा येथे त्यांची आज सकाळी सभा होणार आहे.शरद पवार आज सकाळी करमाळा येथे हेलिकॉप्टरने आले असता हेलिपॅडवर त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
- निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देखील देवळालीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवाराबाबत संभ्रम कायम
- अजित पवारांनी गिरणारेच्या सभेत दाखवलं शिंदेंच्या शिवसेनेच्या सचिवांच पत्र
- पत्रात देवळाली मतदारसंघात अजित पवार गटाच्या सरोज अहिरे याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार असून त्यांना शिवसेना पाठिंबा देत असल्याचा उल्लेख
- तर एकनाथ शिंदेंच्याच आदेशाने शिवसेनेच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांचा प्रचार करतोय
- देवळालीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा
- ८ तारखेच पत्र अजित पवारांनी १६ तारखेला का दाखवलं? शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सवाल
- पत्र दाखवण्यासाठी आठ दिवस का लागले?
- आमच्या पक्षाचं पत्र आमच्या पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावर का आलं नाही?
- देवळाली मतदारसंघात राजश्री अहिरराव याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार, पदाधिकाऱ्यांचा दावा
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह उपबाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
यामध्ये मुख्य बाजारातील फळ-भाजीपालाकांदा-बटाटा विभाग, केळी आणि गुरांचा बाजार, गूळ भुसार विभाग, भुईकाटा केंद्र, पेट्रोल पंप, फूल बाजार, पान बाजार, तसेच मोशी, पिंपरी, मांजरी, उत्तमनगर व खडकी येथील उपबाजार बंद राहणार आहेत.
जालना विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण मैदानात उतरले आहेत. अरविंद चव्हाण ग्रामीण भागात जाऊन अर्जुन खोतकर यांचा प्रचार करत आहे .आज पीरकल्याण सर्कलमधल्या अनेक गावांमध्ये अरविंद चव्हाण यांनी डोर टू डोर प्रचार करत अर्जुन खोतकर यांना विजयी करण्याचे आवाहन केलं आहे.. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकरच विजय होतील असा विश्वास देखील यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केला आहे
देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे
संजय राऊत, शिवसेना(UBT)
मागील विधानसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता.या पराभवाला माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेच जवाबदार होते.राजश्री पाटील यांच्या विरोधात मागच्या वेळेस माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उघडपणे प्रचार केला होता. तेंव्हापासून प्रताप पाटील आणि हेमंत पाटील यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते.परंतु या निवडणुकीत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मैदानात आहेत.त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन पाऊले मागे येत हेमंत पाटील यांच्या सोबतचे वितुष्ट मिठवण्याचा प्रयत्न केला.अखेर हेमंत पाटील आणि प्रताप पाटील यांच्या मध्ये एका प्रचार सभेत मनोमिलन झाले. जिल्ह्यातील या बड्या नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याने याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे.
संगमनेर विधानसभेत युतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा प्रचार करतो म्हणून एकाला बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.. मारहाण झालेल्या पंढरीनाथ वलवे यांना रात्री उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा रद्द...
रात्री नागपुरात होते मुक्कामी...
आज थोड्याच वेळात दिल्लीला जाणार आहे...
काही अपरिहार्य कारणाने दौरा रद्द..
त्यांच्या ऐवजी भाजपच्या अन्य नेते सभा घेतील अशी माहिती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वऱ्हाडे यांनी मला 25 लाख रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल केलं असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या व तिवसा मतदार संघाच्या मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला. सुनील वऱ्हाडे हे सुनील वऱ्हाडे स्वतः च्या फायद्या साठी सगळं करतात पक्षाचे हिताचे काम सुनील वऱ्हाडे करत नाही ते व्यापारी आहे त्यामुळे मला ब्लँकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप यशोमचे ठाकूर यांनी केला आहे. 25 लाख रुपये द्या मी प्रचार करणार नाही दवाखान्यात ऍडमिट होतो असं म्हटलं असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला तर यावर सुनील वऱ्हाडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावले व मी यशोमती ठाकूर यांच्यावर मानहानी दावा ठोकणार व मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया सुनील वऱ्हाडे यांनी दिली.
रिझर्व्ह बॅकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर शनिवारी सकाळी १० च्या सुमारास हा फोन आला होता
फोन वरील व्यक्तीने आपण लष्कर ए तोय्यबा चा CEO असल्याचे सांगत बॅक बंद करा, इलेक्ट्रीक कार रॅबीस असे म्हणत फोन ठेवून दिला*
या घटनेची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बॅकेच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मात्र कुणीतरी हे खोडसाळ कृत्य केल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड - लातूर रोडवरील सेलू आंबा टोल नाक्यावर सदरील घटना घडली असून घटनेत दोन युवक जखमी आहेत. संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला ? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. परंतु विधानसभा निवडणुकी दरम्यान ही घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दिवसाला ४ ते ६ सभा मुख्यमंत्री घेत असून २९ दिवसात मुख्यमंत्र्यांनी जाहिर सभांची 'हाफ सेन्चुरी' केली.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसानी केलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसानी जप्त केली ८० कोटींची चांदी.जप्त केलेली चांदी निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडे अधिक चौकशीसाठी सोपवण्यात आलेली आहे.
वाशी चेकनाका येथे नाकाबंदीदरम्यान चेन्नईवरून आलेला एक ट्रक तपासण्यात आला ज्यात ही चांदी होती. जवळपास ८ हजार ४७६ किलोची ही चांदी असून ती आता तपासली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि स्वतः शरद पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूरच्या माढ्यात शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे दुपारी शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेची मोठी तयार करण्यात आली आहे. शरद पवार यांची साथ सोडून महायुतीच्या गोटात सामील झालेल्या आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात शरद पवार काय बोलतात याकडेच लक्ष लागले आहे.
येथे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहे. अभिजीत पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांच्या काटे टक्कर अशी लढत होत आहे.
Maharashtra News Live Updates : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेमधून साकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या किमान 180 जागा निवडून येतील असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार मोडनिंब येथे आले होते. सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला मोठं यश मिळले असा विश्वास व्यक्त केला आहे. सुरवातीला 155 -160 जगा निवडून येतील असं वाटत होतं पण लोकांचा प्रतिसाद पाहाता किमान 180 जागा निवडून येतील असा ठाम आमचा विश्वास आहे. शरद पवार,राहुल गांधी, प्रियंका गांधी, उध्दव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे चार दिवसांपासून वातावरण तापले आहे. मोदीची मुंबईत सभा झाली. त्यांच्या सभेकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे स्पष्ट असल्याचं ही आमदार पवार यांनी म्हटले आहे.
अमरावतीच्या दर्यापूर मधील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा...
पोलिसांनी केले 45 जणांवर गुन्हे दाखल; चार जणांना घेतलं ताब्यात राडा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.