Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोना, ट्वीट करून दिली माहिती

माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Shivani Tichkule

नागपूर - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना करोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

हे देखील पाहा -

ट्विट करत ते म्हणले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी गृह विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषधं आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस यांना ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना करोनाची लागण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

Versova-Madh Bridge: २२ किमीचं अंतर फक्त ५ मिनिटात, वर्सोवा-मढदरम्यान तयार होणार केबल ब्रिज

भयंकर! ट्रेन येताच थेट रुळावर पळत पळत आली तरुणी अन्…, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update : शरद पवार गटाला खिंडार; नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते आज करणार भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : ... तर आज कोकाटेंचा सेंडऑफ, रोहित पवारांची बोचरी टीका

SCROLL FOR NEXT