देवेंद्र फडणवीस SaamTV
महाराष्ट्र

ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केलं - देवेंद्र फडणवीस

3 महिन्यात रिपोर्ट न केल्याने ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. या सरकरमध्ये ओबीसीविरोधी मंत्री आहेत, असा घणाघात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केले आहे. 3 महिन्यात रिपोर्ट न केल्याने ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. या सरकरमध्ये ओबीसीविरोधी मंत्री आहेत, असा घणाघात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर केला आहे. ते भंडारा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर बोलत होते. BJP Leader Devendra Fadnavis criticize Mahavikas Aghadi Govt Over OBC Reservation Issue

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सरकार शोधा बक्षिस मिळवा, ही बातमी साम टीव्ही वर आली. देवेंद्र फडणवीसांनी भाषणादरम्यान साम टीव्हीचा उल्लेख केला. पुढे ते म्हणाले, "मी मुख्यमत्री असतांना बोनस देण्याची सुरुवात केली. सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचे. नाना पटोले 'संविधान खतरे में है', म्हणायचे. पण खरे तर धान पीक घेणारे शेतकरी खतरे में हैं."

"कोरोनामध्ये मदत केली नाही. मात्र, बार मालक शरद पवारांकडे गेले आणि लायसन्स फी कमी करवून घेतली. विदेशी दारु 50 टक्के कर माफ झाली. विदेशी दारु स्वस्त झाली. हे गरीब लोकांचे सरकार नसून दारु विकण्याऱ्यांचे सरकार आहे", असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा -

"5 वर्षात एकाही शेतकऱ्यांची विज कापली नाही. मात्र, हे सरकार रोज वीज कापत आहेत. एका डीपीवर 4 शेतकऱ्यांनी वीज भरली नाही, तरी पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे".

"ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केले आहे. 3 महिन्यात रिपोर्ट न केल्याने ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. या सरकरमध्ये ओबीसीविरोधी मंत्री आहेत. आम्ही सत्तेत होतो, तेव्हा हलबा समाजाला संरक्षण दिले. मात्र, या सरकारने हलबा संरक्षण न दिल्याने हलबा समाजचे आरक्षणही धोक्यात आले आहे", असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT